राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा

By अनंत खं.जाधव | Published: September 27, 2023 05:38 PM2023-09-27T17:38:22+5:302023-09-27T17:38:58+5:30

निव्वळ अफवा पसरविण्याचे काम 

Not a single school in the state will be closed, declared School Education Minister Deepak Kesarkar | राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा

राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केला खुलासा

googlenewsNext

सावंतवाडी : महाराष्ट्रात शाळा बंद करणार आणि बार ना परवाने देणार अशा प्रकारे अफवा पसरविण्यात येत आहेत. या चुकीच्या असून असे कधीही होणार नाही. एकही शाळा बंद होणार नाही असा खुलासा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच अफवा पसरविणारे मला कोण ते माहित नाहीत असेही म्हणाले.

मंत्री केसरकर हे आज, बुधवारी एक दिवसाच्या सिंधुदुर्ग दौर्‍यावर होते. यावेळी त्यांनी हा खुलासा केला. काही वृत्तपत्रात शाळा बंद होणार म्हणून सांगितले जात आहे. पण मुळात असे काही होणार नाही. एकही शाळा बंद केली जाणार नाही. राज्यात शाळा बंद, बार ना परवाने असे कधीही शक्य नाही. याबाबत कोण अफवा पसरवतोय हे मला माहित नाही. ज्या शाळा नादुरुस्त आहेत त्याबाबत आम्ही माहिती घेतो याचा अर्थ त्या बंद करण्याचा कोणताही उद्देश नाही असेही मंत्री केसरकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: Not a single school in the state will be closed, declared School Education Minister Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.