रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांपेक्षा नोटाला मतदान जास्त

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 6, 2024 06:57 PM2024-06-06T18:57:18+5:302024-06-06T18:57:49+5:30

सिंधुदुर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण ९ लाख १४ हजार ३८ ...

Nota vote is more than six candidates In Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांपेक्षा नोटाला मतदान जास्त

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवारांपेक्षा नोटाला मतदान जास्त

सिंधुदुर्ग : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात झालेल्या तिसऱ्या टप्प्यातील एकूण ९ लाख १४ हजार ३८ एवढ्या एकूण मतदानापैकी ११६४३ एवढी मते नोटाला देऊन या मतदारांनी उमेदवारांना नाकारले आहे. मात्र, या मतदार संघातील एकूण नऊ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

नोटाला ११६४३ मते

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११६४३ मतदाराने सर्वच नऊ उमेदवारांना नाकारले असून नोटाचा पर्याय स्वीकारला आहे.

सहा उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील सहा उमेदवारांना नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत.

२०१९च्या तुलनेत नोटाची मते वाढली

२०१९ सालात् झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नोटांची संख्या १२३९८ होती. त्या तुलनेत यावर्षीच्या निवडणुकीत नोटांची संख्या घटली आहे.

नोटापेक्षाही कमी मते मिळालेले सहा उमेदवार

उमेदवार मिळालेली - मते

  • राजेंद्र आयरे (बसपा) - ७८५६
  • अशोक पवार (बहुजन मुक्ती पार्टी) - ५२८०
  • मारुती जोशी (वंचित आघाडी) - १००३९
  • सुरेश शिंदे (सैनिक समाज पार्टी) - २२४७
  • अमृत तांबडे (राजापूरकर, अपक्ष) - ५५८२
  • शकील सावंत (अपक्ष) - ६३९५

Web Title: Nota vote is more than six candidates In Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.