पंधरा वर्षात काही केले नाही, आता काय करणार; राजन तेलींचे दीपक केसरकरांवर टीकास्त्र 

By अनंत खं.जाधव | Published: October 23, 2024 12:08 PM2024-10-23T12:08:10+5:302024-10-23T12:09:21+5:30

'केसरकरांना कायमचे गुडबाय करून जर्मनीला पाठवूया'

Nothing has been done in fifteen years, what to do now; Rajan Teli criticism of Deepak Kesarkar | पंधरा वर्षात काही केले नाही, आता काय करणार; राजन तेलींचे दीपक केसरकरांवर टीकास्त्र 

पंधरा वर्षात काही केले नाही, आता काय करणार; राजन तेलींचे दीपक केसरकरांवर टीकास्त्र 

सावंतवाडी : निवडणूक आली की मंत्री दीपक केसरकर यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवते. विकास झाला नाही तो कळतो. त्यामुळेच आता येथील जनतेने सावध झाले पाहिजे आणि यांना कायमचे गुडबाय करून जर्मनीला पाठवूया २३ नोव्हेंबर रात्रीचे तिकिट काढूनच ठेवले आहे अशी जोरदार टीका उद्धवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली यांनी केली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ, मायकल डिसोझा रियाज खान उपस्थित होते.

तेली म्हणाले, केसरकर यांनी मागील पंधरा वर्षात मतदार संघात कोणतेच विकास काम केले नाही. त्यामुळे त्यांना आज अनेक विकासकामे अपुरी आहेत याची आठवण होते. त्यामुळेच ते पुन्हा पुन्हा संधी द्या असे येथील जनतेला आवाहन करत आहेत. पण आता जनतेने ओळखले पाहिजे. हे पुन्हा संधी मागतात पण विकास कामे करत नाही त्यामुळेच जनतेने बदल करावा आणि आमदार नवीन हवा असे सांगितले.

तेव्हा त्यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवली नाही? 

२००९ मध्ये केसरकर यांच्या निवडणुकीत ही काम केलं तेव्हा त्यांना माझी गुन्हेगारी पार्श्वभूमी आठवली नाही का? असा सवाल केला. ते जी टीका करत आहेत त्याला येथील जनता भीक घालणार नाही. आता जनतेला सर्व काही कळले आहे. केसरकर फक्त आश्वासन देतात प्रत्यक्षात कोणतेच विकास काम करत नाही. त्यामुळे त्यांच्या शिक्षणखात्यातही मोठा भ्रष्टाचार झाला आहे असा आरोपी तेली यांनी केला.

Web Title: Nothing has been done in fifteen years, what to do now; Rajan Teli criticism of Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.