उमेदवारीचे काही माहीत नाही, पण.. मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Published: October 21, 2024 05:01 PM2024-10-21T17:01:21+5:302024-10-21T17:09:55+5:30

..तर पक्ष फुटला नसता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

Nothing is known about the Assembly candidature, but.. Minister Deepak Kesarkar made it clear | उमेदवारीचे काही माहीत नाही, पण.. मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

उमेदवारीचे काही माहीत नाही, पण.. मंत्री दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

सावंतवाडी : भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. शिंदे सेनेची ही यादी लवकरच जाहीर होईल. यादी जाहीर करण्याचे सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आहेत, त्यामुळे ते यादी जाहीर करतील. मला अद्याप उमेदवारीचे काही सांगण्यात आले नाही. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारेन असे स्पष्ट मत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आज, सोमवारी सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा सुसंस्कृत लोकांचा आहे. त्यामुळे येथे गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसांना जनता स्वीकारणार नाही. जे माझ्या विरोधात उभे राहू इच्छितात त्यांचा येथील जनतेने दोन वेळा पराभव केला. आता ते पराभवाच्या हॅट्रिकसाठी उभे राहात असून त्यांचे पार्सल आपणास कणकवलीला पाठवायचे आहे, हे येथील सुज्ञ नागरिकांनी लक्षात ठेवावे असे आवाहनही केसरकर यांनी केले. आमची महायुती अभेद्य असून विकास कामाच्या बळावर आम्ही निवडणुकीला सामोरे जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

..अन्यथा शिक्षणाधिकार्‍यांवर थेट कारवाई

शाळेची वेळ पुर्वीप्रमाणेच करण्यात यावी म्हणून पालकांच्या तक्रारी आहेत. पण याबाबतचे आदेश आम्ही शिक्षणाधिकार्‍यांना पूर्वीच दिले आहेत. मात्र त्यांनी ते न पाळल्यास थेट त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रात आम्ही आमुलाग्र बदल घडवून आणले. मराठी भाषा मंत्री म्हणून अनेक वर्षे प्रलंबित धोरण घेऊन आलो तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. हे सर्व करत असताना मतदारसंघात ही कुठे कमी पडलो नाही. जी आश्वासने दिली ती पूर्ण केली असे ही मंत्री केसरकर म्हणाले.

तेलींवर बोचरी टीका

राजन तेली यांच्या टीकेला उत्तर देताना केसरकर म्हणाले, माझ्यावर आरोप करण्यापुर्वी केलेली मदत त्यांनी विसरू नये. हे ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीस उभे राहिले, त्या त्या ठिकाणी पराभूत झाले, यात माझा काय दोष. जिल्हा परिषद अध्यक्षा असतानाही त्यांना पराभूत करण्यात आले. जिल्हा बँक अध्यक्ष असतानाही संचालक म्हणूनही ते पराभूत झाले. दोन वेळा सावंतवाडी मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला अशी बोचरी टीका केली.

..तर पक्ष फुटला नसता, मंत्री दीपक केसरकरांचा गौप्यस्फोट

ज्यावेळी शिवसेना फुटली त्यावेळी गेलेल्या आमदारांना पुन्हा बोलवा, त्यांची समजूत काढा, अशी मागणी घेवून मी स्वतः उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. यावेळी त्यांना बोलविण्याचे सोडून तुम्ही पण त्यांच्या सोबत जा, असे ठाकरे यांनी आपल्याला सांगितले, असा गौप्यस्फोट करीत त्यावेळी ठाकरेंनी समजूतपणाची भूमिका घेतली असती तर पक्ष फुटला नसता, असेही  केसरकर म्हणाले.

Web Title: Nothing is known about the Assembly candidature, but.. Minister Deepak Kesarkar made it clear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.