थकीत अर्थसहाय्याबाबत सिंधुदुर्गातील तीन पतसंस्थांना नोटीस
By Admin | Published: April 1, 2017 04:52 PM2017-04-01T16:52:50+5:302017-04-01T16:52:50+5:30
जिल्हा उपनिबंधकांची कारवाई, कायदेशीर कारवाईचा इशारा
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. १ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पतसंस्थांनी शासन अर्थसहायित थकीत रक्कम १५ दिवसांच्या आत शासनाची भरणा करण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी केले आहे. अन्यथा कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल असेही नमूद केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन पतसंस्थांनी शासनाकडे अर्थसहाय्य परतफेडीच्या अनुषंगाने हमीपत्र दिले होते. मात्र ३१ मार्च २0१७ पर्यंत या पतसंस्थांनी सदर अर्थसहाय्य रक्कम शासनखाती १00 टक्के भरणा केलेली नाही. याबाबत या संस्थांकडे बराच पत्र व्यवहार व पाठपुरावा करण्यात आला आहे. प्रत्येक संस्थेला कृति आराखडा ठरवून देऊनही विहित कालावधीत विहित रक्कम भरण्यास कळविले होते.
शासन अर्थसहाय्य रक्कम परतफेड केलेली नाही, म्हणून बांदानगर अर्बन क्रेडीट को. आॅप. सो. लि. बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग (थकीत अर्थसहाय्य रक्कम रु. ३११.६0 लाख), भाईसाहेब नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सावंतवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग (थकीत अर्थसहाय्य रक्कम रु. २४.२७ लाख), जनता नागरी सहकारी पतसंस्था मर्या. दोडामार्ग, जि. सिंधुदुर्ग (थकीत अर्थसहाय्य रक्कम रू. ५४.0७ लाख) या तीन पतसंस्थांना जाहीर नोटीस देंण्यात आली आहे.
या संस्थांच्या संचालकांनी आपल्याकडील शासन अर्थसहाय्याची थकीत रक्कम १५ दिवसात शासनखाती भरणा करुन तसा कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा, अन्यथा पुढील जाहिर नोटीसीने पुढील कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल याची नोंद घ्यावी.
जिल्हा उपनिबंधक
सहकारी संस्था, सिंधुदुर्ग