कुख्यात गुन्हेगार उत्तम बारडकडून वैभववाडीतील तीन गुन्ह्यांची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 07:12 PM2019-09-30T19:12:52+5:302019-09-30T19:14:13+5:30
उत्तम बारड हा कुख्यात गुन्हेगार आहे. राज्यासह गोवा, कर्नाटक या तीन राज्यात त्याच्यावर दरोडा, लूटमार असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला अनेकदा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान,
वैभववाडी : कुख्यात गुन्हेगार उत्तम बारडने वैभववाडीतील तीनही गुन्ह्यांची कबुली दिली असून त्याने विक्री केलेला १ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल गोवा-म्हापसा येथून वैभववाडी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. बारड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर राज्यासह गोवा आणि कर्नाटकमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
उत्तम बारड हा कुख्यात गुन्हेगार आहे. राज्यासह गोवा, कर्नाटक या तीन राज्यात त्याच्यावर दरोडा, लूटमार असे शेकडो गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला अनेकदा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान, कोकिसरे बांधवाडी, नाधवडे नवलादेवीवाडी आणि लोरे सुतारवाडी येथील महिलांच्या गळ्यातील दागिने चोरट्याने लुटले होते. त्यातील लोरे आणि नाधवडे या चोऱ्या एकाच दिवशी झाल्या होत्या. या गुन्ह्यांमुळे महिलांमध्ये असुरक्षितेचे भावना निर्माण झाली होती. या गुन्ह्यांचा तपास वैभववाडी पोलीस करीत होते. पोलिसांनी चोरट्याचे रेखाचित्र तयार करून राज्यातील विविध पोलीस स्थानकांमध्ये पाठविली होती. गेल्याच आठवड्यात कोल्हापूर पोलिसांनी वैभववाडीतील चोरी प्रकरणाशी मिळतीजुळती चोरी करताना उत्त्तम बारडला अटक केली होती. त्यामुळे वैभववाडीतील लूटमार चोरी प्रकरणांमध्ये त्याचा हात असावा अशी शक्यता होती. त्यामुळे पोलिसांनी बारडचा ताबा घेतला होता.
दोन दिवसांच्या तपासानंतर संशयित आरोपी बारड याने कोकिसरे, नाधवडे आणि लोरे येथील महिलेच्या गळ्यातील दागिने लुटल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानंतर हे सर्व दागिने त्याने गोवा म्हापसा येथे विक्री केल्याचे पोलिसांना सांगितले त्यानुसार येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांनी गोवा म्हापसा येथे जावून विक्री केलेल्या सोनाराकडून १ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याची दागिने ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे तपासात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलीस अजूनही काही गुन्ह्यात बारडचा हात आहे का याचा तपास करीत आहे
उत्तम बारड हा कोकिसरे रेल्वेफाटकानजीक काही काळ राहत होता. त्या कालावधीत कोकिसरे बेळेकरवाडी, नाधवडे हायस्कूल, तळेरे येथे चोºया झाल्या होत्या. त्यातील कोकिसरे बेळेकरवाडी आणि नाधवडे येथील चोऱ्यांमध्ये त्याचा हात असण्याची शक्यता आहे.