आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 11:35 AM2020-06-13T11:35:31+5:302020-06-13T11:41:36+5:30

सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करून घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे.

Now Fish Aquarium in Malwana, Vaibhav Naik's efforts succeed: 5 crore fund sanctioned in first phase | आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

आता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश

Next
ठळक मुद्देआता मालवणात फिश एक्वेरियम, वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश पहिल्या टप्प्यात ५ कोटी निधी मंजूर

मालवण : सिंधुदुर्गात वाढणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून मालवणमध्ये फिश एक्वेरियम साकारणार आहे. यासाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५ कोटी रुपयांचा निधी आमदार नाईक यांनी मंजूर करून घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आला आहे.

मालवण शहर पर्यटनदृष्ट्या झपाट्याने विकसित होत आहे. दरवर्षी लाखो पर्यटक मालवण समुद्र किनारी भेट देतात. मालवण समुद्रात माशांच्या विविध प्रजाती असून या प्रजाती प्रत्यक्ष पाहता याव्यात, तसेच मालवणच्या पर्यटनात वाढ व्हावी यासाठी मालवण शहरात अद्ययावत फिश एक्वेरियम उभारण्याचा आमदार वैभव नाईक यांचा मानस होता.

आमदार नाईक यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून फिश एक्वेरियमसाठी पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. लॉकडाऊनचा कालावधी असतानाही निधी मंजूर केल्याबद्दल आमदार नाईक यांनी शिंदे यांचे आभार मानले आहेत.

यामुळे मालवणच्या पर्यटनात वाढ होणार असून पर्यटनपूरक इतर व्यवसायांबरोबरच परिसरातील स्थानिकांना रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होणार आहेत.
 

Web Title: Now Fish Aquarium in Malwana, Vaibhav Naik's efforts succeed: 5 crore fund sanctioned in first phase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.