आता फक्त विजयाचीच सभा

By admin | Published: April 1, 2016 01:45 AM2016-04-01T01:45:18+5:302016-04-01T01:46:52+5:30

नारायण राणे : कुडाळात काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ

Now just a win-win meeting | आता फक्त विजयाचीच सभा

आता फक्त विजयाचीच सभा

Next

कुडाळ : आमची टीम ही चांगली असून आमची दूरदृष्टी विधानसभा आहे. येथील मतदार हे आघाडीच्याच उमेदवारांना १०० टक्के विजयी करणार असून कुडाळमध्ये यापुढची सभाही विजयाचीच सभा होणार असल्याचा विश्वास माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला. तुमचा विकास आणि सेवा आम्ही करू. मात्र कुडाळ वासीयांनी काँग्रेस आघाडीलाच विजय करा, असेही आवाहन त्यांनी केले.
काँग्रेस आघाडीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आयोजित सभेत राणे बोलत होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी पक्षाचे कार्याध्यक्ष प्रसाद रेगे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश दळवी, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य अमित सामंत, जिल्हा बँक संचालक विकास सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, लोकसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे अध्यक्ष आनंद शिरवलकर, राष्ट्रवादीचे अतुल रावराणे, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा वनिता पाताडे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, दादा बेळणेकर, विकास कुडाळकर, संदीप कुडतरकर, डॉ. जयेंद्र परुळेकर, दीपलक्ष्मी पडते, तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे म्हणाले, येथून निवडून गेलेल्या खासदारांना संसदेत एक विशेष महत्त्व व सन्मान होता. मात्र सध्याचा खासदार हा अशाप्रकारे भयानक हिंदी भाषा बोलतो की त्याच्या या हिंदी भाषेमुळे आमची त्याने लाज घालवली आहे, असा टोला येथील खासदारांना नारायण राणेंनी लगावला.
पालकमंत्री पुळचट
या जिल्ह्याचा सध्याचा पालकमंत्री हा पुळचट आहे. ग्रामपंचायतीच्या सभेत बोलू न शकणारा येथील मतदारसंघाचा आमदार असून राज्याच्या विधिमंडळात मात्र काहीच बोलत नाही, असा टोलाही राणेंनी लगावत हे सर्वजण एखादा प्रकल्प आणू शकत नाहीतच व आम्ही आणलेले प्रकल्पही त्यांना सुरु ठेवता आले नाहीत. शिवसेना व भाजप जाती जातीत दंगली लावून त्यावर आपली पोळी भाजून सत्ता गाजवितात.
यावेळी आघाडीचे उमेदवार, पदाधिकारी कार्यकर्ते व कुडाळ वासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रणजित देसाई तर सूत्रसंचालन सुनील भोगटे यांनी केले. आभार दिनेश साळगावकर यांनी मानले. (प्रतिनिधी)

प्रसाद रेगे : आघाडीचा विजय होणार हे निश्चित
प्रसाद रेगे म्हणाले की, काही तांत्रिक अडचणींमुळे आम्ही दोन जागांवर निवडणूक लढवत आहोत. मात्र, आम्ही एकच आहोत. आम्ही उंबरा उंबऱ्यावर फिरणारे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आघाडीचाच विजय होणार हे निश्चित आहे. सुरेश दळवी म्हणाले की, जिल्ह्याचा विकास फक्त राणेंनीच केला असून युती सरकारकडे व्हिजन नाही. या निवडणुकीत मतभेद ठेवू नका. यापुढे सर्व एकच होणार आहोत असे सांगितले. विकास सावंत म्हणाले की, सध्याचे सत्ताधारी सरकार हे मस्तवाल झालेले सरकार आहे. या जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत असे आम्ही मानतो.


आमच्याकडे टक्केवारी घेणारे नाहीत
आमची आघाडी आकड्यावर नाही तर एकदिलाने झाली आहे. युती सरकारच्या नाराजीचे रुपांतर आमच्या यशात होणार आहे. दाखल्यांसाठी टक्केवारी घेणारे, पैसे मागणारे आमचे उमेदवार नसून चांगले उमेदवार आहेत. येथील आमदारांना जिल्हाधिकारी, एस.पी. ओळखत नाही. ही स्थिती असताना प्रशासनावर अंकुश हे लोकप्रतिनिधी काय ठेवणार? असेही सावंत म्हणाले.

Web Title: Now just a win-win meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.