घरबांधणी अधिकारासाठी आता सरपंच संघटना

By admin | Published: January 18, 2016 11:53 PM2016-01-18T23:53:06+5:302016-01-19T00:06:43+5:30

अध्यक्षपदी दीपक सावंत : घरबांधणीच्या नव्या कायद्याबाबत आक्रमक धोरण

Now the Sarpanch organization for housing rights | घरबांधणी अधिकारासाठी आता सरपंच संघटना

घरबांधणी अधिकारासाठी आता सरपंच संघटना

Next

देवरुख : संगमेश्वर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी आंबवलीचे सरपंच दीपक सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. घरबांधणीचे अधिकार शासनाने ग्रामपंचायतींकडून जिल्हास्तरावर वर्ग केले आहेत. याविरोधात आवाज उठवण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.पंचायत समितीच्या छत्रपती संभाजी सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीसाठी संगमेश्वर तालुक्यातील १२२ ग्रामपंचायतींचे सरपंच प्रथमच एकत्र आले होते. यावेळी शासनाने १९५८चे कलम ५२, ५३मध्ये सुधारणा करून घरबांधणी परवानगीचे अधिकार सरपंचांकडून काढून ते नगररचनाकार, तहसीलदार व नायब तहसीलदार यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.हा निर्णय सरपंचांच्या अधिकारावर गदा आणणारा असल्याने तालुक्यातील सरपंचांना एकत्र आणण्यासाठी बावा चव्हाण, दीपक सावंत, प्रवीण टक्के, वसंत उजगावकर यांनी पुढाकार घेतला होता. यानुसार घेण्यात आलेल्या सरपंचांच्या पहिल्या बैठकीत शासनाच्या आदेशाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यानंतर ही दुसरी बैठक घेण्यात आली.या बैठकीत न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी तालुक्यातील सरपंचांची संघटना स्थापण्याचे निश्चित करण्यात आले. निवड प्रक्रियेतून १७ जणांची कार्यकारिणी तयार करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी दीपक सावंत, उपाध्यक्षपदी मेघा कदम, सचिवपदी प्रवीण टक्के, सहसचिव म्हणून जमुरत अलजी यांची पदाधिकारी म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. संगमेश्वरप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये सरपंच संघटना तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. सरपंचांच्या अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी एक जिल्ह्यातील सरपंचांसाठी जिल्हास्तरीय शिबिर आयोजित करण्याचेही ठरविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Now the Sarpanch organization for housing rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.