आंबोलीत येणाऱ्या पर्यटकांसाठी आता उपद्रव शुल्क, शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 11:43 AM2023-07-06T11:43:32+5:302023-07-06T12:05:21+5:30
सिंधुदुर्गनगरी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापुढे उपद्रव शुल्क निधी संकलित करण्यात येणार आहे. धबधब्याच्या ठिकाणी व ...
सिंधुदुर्गनगरी : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून यापुढे उपद्रव शुल्क निधी संकलित करण्यात येणार आहे. धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात, तसेच वनहद्दीत कचरा करू नये, वनास व पर्यावरणास बाधा पोहोचवणारे कोणतेही कृत्य करू नये, वन व वन्यजीव कायद्यांचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शासकीय जंगलात अपप्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून, सावंतवाडी तालुक्यातील पारपोली वनक्षेत्रात आंबोली धबधबा येतो. याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. पर्यटकांकडून धबधब्याच्या ठिकाणी व घाट परिसरात प्लास्टिक कचरा, बॉटल, खाद्यपदार्थांचे रॅपर, तसेच इतर घनकचरा केला जातो. त्यामुळे पर्यावरणास बाधा निर्माण होऊन वनातील जैवसाखळीवर त्याचा दुष्परिणाम होतो, तसेच पर्यटकांकडून होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे वन्यजीवांच्या अधिवासास बाधा निर्माण होते, असेही त्यांनी सांगितले.
१४ वर्षांवरील व्यक्ती २०, पाच वर्षांवरील मुलास १०
मुख्य धबधबा पारपोली वनहद्दीत असल्याने आंबोली धबधब्यास भेट देणाऱ्या पर्यटकांकडून १४ वर्षांवरील व्यक्तीस २० रुपये व ५ वर्षांवरील मुलास १० रुपये, असे शुल्क पारपोली संयुक्त वनव्यवस्थापन समितीमार्फत आकारण्यात येईल. जमा होणाऱ्या रकमेचा वापर धबधबा व्यवस्थापनासाठी तात्पुरत्या स्वरूपात काम करणाऱ्या मजुरांचे मानधन व इतर खर्चासाठी करण्यात येईल. शिल्लक राहणारी रक्कम पारपोली, आंबोली व चौकुळ येथील वनविकासासाठी वापरण्यात येईल.
दंड ठोठाविण्याच इशारा
मुख्य धबधब्यावरील पर्यटन उपद्रव शुल्क वसूल करताना, तसेच आनुषंगिक बाबींमध्ये कोणत्याही व्यक्तीने अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणला म्हणून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येईल, तसेच प्रचलित नियमानुसार आर्थिक दंड आकारला जाणार आहे.
Fort or a local train station?
— Rishi Darda (@rishidarda) July 5, 2023
Crazy scenes of the tourist crowd gathered at the historic fort Lohgad near Pune, a very popular site to visit during the monsoons.
Thankfully unwanted crowd mismanagement incidents were avoided.#Lohgad#HistoricFort#Heritage#TouristSpot… pic.twitter.com/7NDjkIF5ux