युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

By admin | Published: September 23, 2015 10:05 PM2015-09-23T22:05:43+5:302015-09-24T00:08:58+5:30

बी. जी. शेळके : आज हृदयविकार जागरूकता दिन

The number of heart attacks in the youth is alarming | युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

युवकांमधील हृदयविकाराचे प्रमाण चिंताजनक

Next

मिलिंद पारकर -कणकवली ==अवघ्या २० ते ३० वयोगटातील तरूणांचे हृदयविकाराने अचानक मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बदलत्या जीवनशैलीचा फटका भारतीय तरूणांना बसत असून त्यामुळे नियमित तपासणी आवश्यक बनली आहे. तरूणांनी आपल्या हृदयाकडे जागरूकतेने बघून आहारविहारात आवश्यक बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक हृदयविकार जागरूकता दिनानिमित्त डॉ. बी. जी. शेळके यांच्याशी साधण्यात आलेला संवाद..
तरूणांचे हृदयविकाराने मृत्यू झाल्याच्या घटना वाढल्या आहेत?
डॉ. शेळके : गेली पंचवीस वर्षे मी डॉक्टरी पेशात काम करताना अलिकडे २० ते ३० वयोगटातील मुलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. ५० ते ६० वयोगटात येणारे हृदयविकाराचे झटके आता युवकांमध्येही बसत आहेत. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढते आहे. तरूण मुलांमध्ये रक्तदाबाचा विकार वाढत असल्याचे दिसून आले आहे. २०२० साली २०-३० वयोगटातील भारतीय तरूणांचे बळी जाण्याचे प्रमाण ५० हजार असेल, अशी शक्यता एका अभ्यासातून वर्तविण्यात आली आहे. आणि ती अतिशय धोकादायक आहे.
युवकांमध्ये हृदयविकार वाढण्याचे कारण काय?
डॉ. शेळके : सध्याची जीवनशैली बदलली असून ताणतणावाचे प्रमाणही वाढले आहे. हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित श्रम आवश्यक आहेत. परंतु युवकांच्या हाती दुचाकी, चारचाकी वाहने आहेत. आणि खाण्यात चायनीज, शीतपेये, फास्टफूड आहे. या खाण्यातून मीठाचे प्रमाण वाढते. तसेच शीतपेयांमधून अतिप्रमाणात साखर पोटात जाते. एका शीतपेयाच्या बाटलीतून २०० ग्रॅम साखर पोटात जाते. या साखरेतून तब्बल ८०० कॅलरीज शरीरात जातात. एवढ्या कॅलरी जाळण्यासाठी ६ तास व्यायाम करावा लागेल. छातीत मध्यभागी दुखणे, पोटापासून कानापर्यंत वेदना जाणे, विशेषत: डाव्या हातात वेदना होणे, घाम येणे, नाडीचे ठोके वाढणे, जीव घाबरा होणे आदी हृदयविकाराची लक्षणे आहेत
पाश्चिमात्य जीवनशैली व भारतीय जीवनशैलीत फरक कोणता?
डॉ. शेळके : पाश्चिमात्यांमध्ये आणि भारतीयांत भौगोलिक दृष्टीने मोठा फरक पडतो. पाश्चिमात्यांमध्ये सॅलडचा म्हणजे कच्च्या भाज्या, गाजर, टोमॅटो आदींचा आहारात वापर खूप असतो. त्यामुळे शरीरात फायबरचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होते. हेच फायबर जास्तीच्या चरबीला शरीराबाहेर टाकतात. मात्र, आपल्याकडे भाज्या खाण्यास नाक मुरडले जाते. पाश्चिमात्य जीवनशैलीत एकाच वेळी पोटभर न खाता दिवसातून चार-पाच वेळा थोडे-थोडे खाल्ले जाते. आपल्याकडे एकाचवेळी जास्त खाण्यावर भर दिला जातो. पाश्चिमात्यांच्या शरीरात मूळातच घातक कॉलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. तर भारतीयांमध्ये जास्त असते. पाश्चिमात्यांचा ३० बीएमआय नॉर्मल समजला जातो. तर आपल्याकडील व्यक्तीमध्ये २५ बीएमआय (वजन-उंची गुणोत्तर) ही पातळी ठरवण्यात आली आहे.
हॉटेलात जाऊन खाण्यामुळे धोका वाढतोय का?
डॉ. शेळके : निश्चितच. हॉटेलमध्ये जाऊन खाण्याकडे युवकांचा विशेषत: कल वाढला आहे. त्यामध्येही चमचमीत चायनीज खाण्यावर भर दिला जातो. एकाच तेलात परत परत तळल्याने घातक कॉलेस्टेरॉल तेलात उतरतात. हॉटेलमधील बहुतांश पदार्थ मैद्यापासून बनवले जातात. ज्यामध्ये फायबरचा लवलेश नसतो. एक कप चहात ७० कॅलरीज असतात. जास्त कॅलरीज (उष्मांक) ग्रहण करणाऱ्या व्यक्तींचे आयुर्मान कमी असते असा अभ्यास आहे. उष्मांक घेण्याचे प्रमाण वाढल्यास नवीन पेशी, रक्तवाहिन्या निर्माण होण्याचे प्रमाण घटते आणि अकाली मृत्यूची शक्यताही वाढत जाते.

Web Title: The number of heart attacks in the youth is alarming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.