coronavirus: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधित सक्रिय रुग्णांची संख्या ७२ वर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:39 AM2022-08-01T11:39:20+5:302022-08-01T11:48:15+5:30
कणकवली : जिल्ह्यात काल, रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५६ हजार ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ रुग्णांवर उपचार ...
कणकवली : जिल्ह्यात काल, रविवारी दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५६ हजार ३०० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रविवारी आणखी ५ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर बरे झालेले रुग्ण ५६,३०० आहेत. तर आज अखेर मृत झालेले रुग्ण १५३६ आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव सुरू झाल्यापासून आज पर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ५७९०८ आहेत.
दरम्यान, आता श्रावण महिना सुरू झाला असून विविध सण साजरे केले जाणार आहे. यावेळी नागरीकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.