कुणकेश्वर सोसायटीचे कार्यालय फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 01:28 PM2020-10-19T13:28:16+5:302020-10-19T13:31:54+5:30
kunkeswar, ghrphodi, sindhudurgnews, crime कुणकेश्वर सेवा सोसायटीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी ६ हजार रुपये रक्कम लांबविली आहे. या घटनेने कुणकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या सचिव वैष्णवी धुवाळी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
देवगड : कुणकेश्वर सेवा सोसायटीचे कार्यालय फोडून चोरट्यांनी ६ हजार रुपये रक्कम लांबविली आहे. या घटनेने कुणकेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे. कुणकेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी या संस्थेच्या सचिव वैष्णवी धुवाळी यांनी याबाबत तक्रार दिली आहे.
गुरुवारी नेहमीप्रमाणे त्या कार्यालय ६ वाजता बंद करून गेल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजता कार्यालय उघडण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यास दरवाजा उघड दिसला व कुलूप तोडलेले होते. त्यांनी संस्थाचालकांना याची कल्पना दिली.
संस्था पदाधिकारी व सचिव वैष्णवी धुवाळी यांनी कार्यालयाकडे येत पाहणी केली.
यावेळी कार्यालयाच्या मुख्य दरवाजाचे कडीकोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करून चोरट्यांनी कपाट फोडले व आतील ६२०० रुपये रक्कम लांबविली. याबाबत पोलिसांना माहिती देताच सहाय्य्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले व कर्मचाऱ्यांनी भेट तेथे जात घटनेचा पंचनामा केला.
ठसेतज्ज्ञ व श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. देवगड शहरात ज्वेलर्स महेश घारे यांच्या दुकानात चोरी केल्यानंतर तीन दिवसांत चोरट्यांनी देवगडपासून जवळच असलेल्या कुणकेश्वरमध्ये चोरी करून पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे.