पिढीजात पायवाटच अडविली

By admin | Published: February 15, 2015 09:38 PM2015-02-15T21:38:40+5:302015-02-15T23:43:20+5:30

आयी हरिजनवाडीतील प्रकार : शेकडो ग्रामस्थांची तहसील कार्यालयात धाव

Old-fashioned footsteps were blocked | पिढीजात पायवाटच अडविली

पिढीजात पायवाटच अडविली

Next

दोडामार्ग : आयी हरिजनवाडीत जाणारी पिढीजात पायवाट काही ग्रामस्थांनी अडविल्याने त्या वाडीतील ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार त्या ग्रामस्थांना समज देऊनही तसाच प्रकार घडत राहिल्याने अखेर ग्रामपंचायत सदस्य भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थांनी शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार संतोष जाधव यांची भेट घेतली. यावेळी जाधव यांनी सोमवारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निर्णय दिला जाईल, असे सांगितले.निवेदनात म्हटले की, सन २00७ मध्ये सदानंद चव्हाण, देवानंद चव्हाण यांनी सर्व्हे नंबर ९३६ मध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे तीन मीटर रुंद व ४५ मीटर लांब एवढा रस्ता वाहतुकीस खुला केला होता. या रस्त्याची नोंद २00७ पूर्वीपासून २६ नंबरमध्ये होती. हा रस्ता आयी दलित वस्तीसाठी होता. तेथील लोकसंख्या सुमारे २५0 एवढी आहे. रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना वरील प्रतिज्ञापत्र करणारे चव्हाण कुटुंबीय अडथळा निर्माण करीत आहेत. यावेळी भरत जाधव यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे सदस्य एकनाथ नाडकर्णी, पंचायत समिती सदस्य जनार्दन गोरे, लाडू जाधव, विष्णू जाधव, साजन जाधव, सावित्री जाधव, शोभावती जाधव, पांडुरंग जाधव, गंगाराम जाधव, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)

चव्हाण कुटुंबीयांकडून अडवणूक
आतापर्यंत फक्त दहा मीटर रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे; परंतु उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करीत असताना वरील प्रतिज्ञापत्र करणारे चव्हाण कुटुंबीय अडथळा निर्माण करीत आहेत. हे कुटुंबीय पूर्वीच्या ठिकाणाहून वाट न देता दुसरीकडून न्या असे सांगत पूर्वीची वाट बंद करावयास लावली. त्यावेळी गावचे सरपंच प्रज्योती एकावडे व पोलीसपाटील गजानन एकावडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. सध्या वाट पूर्णपणे बंद केली आहे व दिलेला रस्ताही बंद करण्यासाठी जोरदार भांडणतंटा करतात.

Web Title: Old-fashioned footsteps were blocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.