जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

By सुधीर राणे | Published: March 14, 2023 01:13 PM2023-03-14T13:13:54+5:302023-03-14T13:14:42+5:30

संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम

Old pension scheme: Panchayat Samiti employees protest in Kankavli | जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

जुनी पेन्शन योजना: कणकवलीत पंचायत समिती  कर्मचाऱ्यांची निदर्शने, जोरदार घोषणाबाजी

googlenewsNext

कणकवली: जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी याप्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी आज, मंगळवारपासून संप पुकारला आहे. जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहेत. कणकवली येथील जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना आणि परिचारिका संघटना यांनी पंचायत समिती परिसरात सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जोरदार निदर्शने केली.

या आंदोलनात जिल्हापरिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना अध्यक्ष मनोज कुमार चव्हाण, उपाध्यक्षा नीलम जाधव, सचिव आनंद जाधव यांच्यासह २८ कर्मचारी तर परिचारिका संघटना अध्यक्षा आश्लेषा कदम यांच्यासह ३० परिचारिका निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.

यावेळी 'कर्मचारी एकजुटीचा विजय असो', 'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.  पंचायत समिती कार्यालय परिसर घोषणांनी कर्मचाऱ्यानी दणाणून सोडला होता. दरम्यान, या संपामुळे सर्वच शासकीय कार्यालयातील कामकाजावर परिणाम झाला आहे.

Web Title: Old pension scheme: Panchayat Samiti employees protest in Kankavli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.