जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 15, 2023 06:54 PM2023-03-15T18:54:51+5:302023-03-15T18:55:29+5:30

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. ...

Old pension scheme: Strike in Sindhudurga disrupts offices, disrupts citizens work | जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली 

जुनी पेन्शन योजना: सिंधुदुर्गात संपामुळे कार्यालयांमध्ये शुकशुकाट, नागरिकांची कामे खोळंबली 

googlenewsNext

सिंधुदुर्ग : जुनी पेन्शन लागू करा, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय शिक्षकेत्तर कर्मचारी १४ मार्चपासून संपावर गेले आहेत. आज संपाचा दुसरा दिवस असून, या संपात ९८ टक्के कर्मचारी सहभागी असल्याने कार्यालयांमध्ये शुकशुकाट पसरला आहे, तसेच नागरिकांची कामेही खोळंबली आहेत.

राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर १४ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून कर्मचाऱ्यांची एकजूट दाखविली, तर आजच्या दुसऱ्या दिवशी संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे.

जोपर्यंत शासनाकडून कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नाही, असा निर्धार करत आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. या धरणे आंदोलनात सर्व संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आहे. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडताना शासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.

प्रशासकीय कामकाज ठप्प

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सुमारे १७ हजार कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले आहे. शासकीय कार्यालयात शुकशुकाट पसरल्याचे दिसून येत आहे.

संप यशस्वी झाल्याचा दावा

राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने पुकारलेल्या या संपात जिल्ह्यातील विविध ६२ कर्मचारी संघटनांचे सुमारे १७ हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. कार्यालयामध्ये केवळ २ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती आहे. त्यामुळे हा संप पूर्णपणे यशस्वी झाला असल्याचा दावा समन्वय समितीच्या वतीने करण्यात आला आहे.

Web Title: Old pension scheme: Strike in Sindhudurga disrupts offices, disrupts citizens work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.