बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 02:33 PM2022-11-25T14:33:32+5:302022-11-25T14:33:58+5:30

सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार

On behalf of Balasaheb's Shiv Sena party, election of office bearers has been announced in Sindhudurga | बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने सिंधुदुर्गात पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर, 'यांच्या' गळ्यात जिल्हाप्रमुखपदाची माळ

googlenewsNext

कणकवली : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुखपदी संजय आग्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानुसार आग्रे यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. तर महिला जिल्हाप्रमुखपदी कुडाळ येथील वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   
 
उपजिल्हाप्रमुखपदी महिंद्र सावंत, शेखर राणे, विश्राम रावराणे यांना नियुक्ती दिली असून सावंतवाडी भागाच्या जिल्हाप्रमुखांची नियुक्ती लवकरच करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मुंबई येथील सह्याद्री बंगल्यावर उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सिंधूरत्न योजना समिती सदस्य किरण सामंत, माजी खासदार सुधीर सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही नियुक्ती करण्यात आली.

या निमित्ताने कणकवली येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत नूतन जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत- पटेल, नूतन तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, भास्कर राणे, सुनील पारकर, शेखर राणे आदी उपस्थित होते.

संजय आग्रे यांच्याकडे कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण या पाच तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर, मालवण- कुडाळ विधानसभा क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, कणकवली विधानसभा क्षेत्र प्रमुख (कणकवली, देवगड, वैभववाडी) संदेश सावंत -पटेल, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत,शेखर राणे, विश्राम रावराणे यांची नावे जाहीर करण्यात आली.

कुडाळ तालुका प्रमुख योगेश उर्फ बंटी तुळसकर, कणकवली - (जानवली. फोंडा, हरकुळ, कलमठ, कळसुली, नाटळ,कणकवली शहर) भुषण परुळेकर ,(कासार्डे, खारेपाटण ) शरद वायंगणकर.

देवगड -(शिरगाव, फणसगाव पोंभूर्ले किंजवडे, देवगड शहर ) -विलास साळसकर, (मिठबाव, पडेल. पुरळ, जामसांडे शहर)-अमोल लोके

मालवण - (आचरा, आडवली, मसुरे, सुकळवाड)- महेश राणे, (देवबाग, कट्टा, पेंडुर, मालवण शहर)- विश्वास गावकर, वैभववाडी :संभाजी रावराणे, कणकवली तालुका समन्वयक- सुनिल पारकर  यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी यावेळी दिली.

Web Title: On behalf of Balasaheb's Shiv Sena party, election of office bearers has been announced in Sindhudurga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.