वागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:13 PM2021-04-02T16:13:22+5:302021-04-02T16:16:55+5:30

Accident Highway Sindhudurg- मुंबई- गोवा महामार्गावर वागदे गोपुरी आश्रमासमोर माल वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ऊलटी होऊन बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील जखमी खुशमीन आजाद खान (रा. राजस्थान) या साडेसतरा वर्षीय युवकाचा गोवा-बांबोळी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंटेनर चालक मुन्फेद समसू खान (३०, रा. राजस्थान) याला महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.

One dies in container accident at Wagade | वागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू

वागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देवागदे येथे कंटेनर अपघातात एकाचा मृत्यू चालक गंभीर जखमी : रस्त्याचा अंदाज न आल्याने घटना

कणकवली : मुंबई- गोवा महामार्गावर वागदे गोपुरी आश्रमासमोर माल वाहतूक करणारा १२ चाकी कंटेनर ऊलटी होऊन बुधवारी मध्यरात्री अपघात झाला. या अपघातातील जखमी खुशमीन आजाद खान (रा. राजस्थान) या साडेसतरा वर्षीय युवकाचा गोवा-बांबोळी येथील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंटेनर चालक मुन्फेद समसू खान (३०, रा. राजस्थान) याला महामार्गावरील वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोवा ते अहमदाबाद असा प्रवास कंटेनर (क्रमांक आर. जे. २३ जी. बी. १५२१) घेऊन मुन्फेद खान व खुशमीन खान हे करीत होते. ते कणकवली जवळ वागदे येथे आले असता मुन्फेद खान याला रात्रीच्या वेळी रस्त्याचा अंदाज न आल्याने रस्ता दुभाजकावर कंटेनर आदळला व बाजूला कलंडला. या अपघातात मुन्फेद खान व खुशमीन खान हे दोघे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. चालक मुन्फेद याच्यासोबत त्याचा चुलत भाऊ खुशमीन हा गोवा पाहण्यासाठी आला होता. अपघातात खुशमीन याचा डावा पाय गुडघ्याखाली जायबंदी झाला होता. तसेच अतिरक्तस्रावही झाला होता.

अधिक उपचारादरम्यान मृत्यू

खुशमीन याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा येथे हलविण्यात आले. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघातानंतर सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खरात, पोलीस हवालदार रविकांत झरकर, पोलीस नाईक किशोर पाडावे, सुमित चव्हाण तसेच महामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Web Title: One dies in container accident at Wagade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.