जानवली येथील गॅरेजमधील स्फोटात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 01:10 PM2019-04-04T13:10:17+5:302019-04-04T13:12:02+5:30

कणकवली  शहरालगतच्या जानवली मारूती मंदिर लगतच्या एका गॅरेजमध्ये वेल्डींगचे काम सुरू असताना कार्बाईटच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. यात ति

One killed in explosion in Garwali garavya | जानवली येथील गॅरेजमधील स्फोटात एक ठार

 जानवली येथील गॅरेज मध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना कार्बाईट टाकीचा स्फोट झाला.

Next
ठळक मुद्देथोड्या वेळाने सिलेंडर मधील ऑक्सिजन संपल्याने आवाज बंद झाला.

कणकवली : कणकवली  शहरालगतच्या जानवली मारूती मंदिर लगतच्या एका गॅरेजमध्ये वेल्डींगचे काम सुरू असताना कार्बाईटच्या टाकीचा अचानक स्फोट झाला. यात तिथे काम करणारा झारखंड येथील जानिब बाबू अन्सारी उर्फ जानी बाबू पेंटरचा (२२) मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली .
   

 जानवली घरटनवाडी येथील नंदू चंद्रकांत राणे यांचे मारुती मंदिर नजीक ' राणे ऑटो गॅरेज ' आहे. तिथे बुधवारी रात्री  १०.२० वाजण्याच्या सुमारास गाडीच्या डेंटिंगचे तसेच वेल्डींगचे काम सुरू होते. यावेळी तेथे दोन कामगार काम करत होते. यातील एक कामगार लगतच्या खोलीमध्ये गेला. तर दुसरा कामगार हा वेल्डिंग करीत होता. यावेळी अचानक मोठा आवाज होऊन कार्बाईट टाकीचा स्फोट झाला. यामध्ये जानिब बाबू अन्सारी हा कामगार गंभीर जखमी झाला. तसेच तेथील  सामानाचे मोठे नुकसान झाले. समोर उभ्या असलेल्या दोन गाडीच्या काचाही फुटल्या
   

    गॅरेज मालक या घटनेदरम्यान कामानिमित्त   बाहेर गेले होते. त्यांना घटनेची माहिती समजताच ते गॅरेज मध्ये दाखल झाले.  त्यांनी  सहकाऱ्यांच्या मदतीने जखमी कामगाराला तातडीने उपजिल्हा  रुग्णालयात नेले. मात्र,  उपचारापूर्वीच जानिब हा मृत झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी जाहीर केले. या स्फोटात गॅरेजचेही मोठे नुकसान झाले आहे.  घटना घडल्यानंतर स्फोटाच्या मोठ्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये  घबराट पसरली. नागरिकांना नेमके काय झाले ? याचा अंदाज येत नव्हता. काही वेळाने घटनेबाबत माहिती समजल्यानंतर नागरिकांची भीती कमी झाली. घटनास्थळी असलेला ऑक्सिजनचा सिलेंडर बंद करायचा राहून गेल्याने त्यातून आवाज येत असल्याने उपस्थित नागरिकांना काही वेळ काय करायचे ? ते समजत नव्हते. थोड्या वेळाने सिलेंडर मधील ऑक्सिजन संपल्याने आवाज बंद झाला.
   

   स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, कार्बाईटच्या टाकीचे तुकडे घटनास्थळाच्या दोन्ही बाजूला शंभर मीटर अंतरावर पडले होते.
घटनेबाबत माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कदम, विनायक चव्हाण आदी पथक दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेऊन पंचनामा केला.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: One killed in explosion in Garwali garavya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.