केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

By admin | Published: November 9, 2015 09:10 PM2015-11-09T21:10:34+5:302015-11-09T23:22:46+5:30

रत्नागिरी जिल्हा : आवळतोय गुन्हेगारीचा विळखा

Only nine cases of 11 murders, 37 rape | केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

केवळ नऊ महिन्यात ११ खून, ३७ बलात्कार

Next

राजेंद्र यादव-- रत्नागिरी -वाढते शहरीकरण व औद्योगिकीकरणाबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे विदारक चित्र उघडकीस येत आहे. गेल्या नऊ महिन्यात रत्नागिरी जिल्ह्यात ११ खून झाले असून, ३७ महिलांवर बलात्कार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याशिवाय चोऱ्या, दरोडे व घरफोड्यांमध्ये वाढ झाली आहे.
राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत कोकणात गुन्हेगारीचे प्रमाण कमी आहे. पोलिसांच्या दृष्टीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्हे हे तणावमुक्त जिल्हे म्हणून ओळखले जायचे. आता मात्र ही ओळख पुसली जाते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार, चोरी, घरफोडी व खून यांसारख्या गंभीर गुन्ह्याच्या प्रमाणात गेल्या नऊ महिन्यात वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते सप्टेंबर या अवघ्या नऊ महिन्यात बलात्काराचे ३७ गुन्हे संंबंधित पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झाले आहेत. सन २०१४मध्ये ही संख्या ३५ इतकी होती. जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात पोलिसांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यापासून अन्य गुन्ह्यांची संख्या १३१२ इतकी आहे. गतवर्षी ती १४४९ इतकी होती. २०१४ मध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल होते. चालू वर्षी नऊ महिन्यामध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न झाल्याच्या घटना १० झाल्या आहेत, तर सदोष मनुष्य वधाखाली दोन गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी दोन दरोडे पडले, तर या नऊ महिन्यांमध्ये चार दरोडे पडल्याची नोंद आहे. एकूण जबरी चोरीच्या घटना ३९ घडल्या, तर ८८ घरफोड्या झाल्या आहेत. चोरीच्या २५१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गर्दी, मारामारीप्रकरणी ६७ गुन्हे नोंद आहेत.
याशिवाय दुखापतप्रकरणी १३१ गुन्हे दाखल आहेत. वाहनांचा प्राणांतिक अपघात व अन्य गुन्हे धरुन हा गुन्ह्यांचा आकडा १३१२ इतका नोंद झाला आहे.


गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ : शांत रत्नागिरीची ओळख बदलतेय
गुन्हेगारी वाढण्यामागे झपाट्याने होणारे शहरीकरण हेच कारणीभूत असल्याचे प्रामुख्याने पुढे येत आहे. अर्थात गुन्हेगारी घटनांची संख्या वाढली असली तरी रत्नागिरीत टोळीयुद्धाच्या घटना घडत नाहीत, ही महत्त्वाची बाब. तेवढ्याबाबत रत्नागिरी जिल्हा शांत आहे. मात्र गुन्हेगारी घटना रोखण्याचे पोलिसांसमोरील आव्हानही मोठे आहे.

परप्रांतीय अधिक
रत्नागिरी जिल्ह्यात दरोडे, चोरीच्या घटनांमध्ये परप्रांतीयच जास्त गुंतल्याचे दिसून येते. चोऱ्यांच्या गुन्ह्यात अनेक आरोपी हे परजिल्ह्यातील असल्याचे दिसून आले. काही चोऱ्यांचा तपास अजूनही पूर्ण व्हायचा आहे.

Web Title: Only nine cases of 11 murders, 37 rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.