शिवसैनिकच बंडखोरांना त्यांची जागा दाखवेल! शिवसेना उपनेते गौरीशंकर खोतांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 02:36 PM2022-07-08T14:36:01+5:302022-07-08T14:36:35+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड अभेद्य राहील

Only Shiv Sainik will show the rebels their place! Shiv Sena Deputy Leader Gaurishankar Khota's warning | शिवसैनिकच बंडखोरांना त्यांची जागा दाखवेल! शिवसेना उपनेते गौरीशंकर खोतांचा इशारा

शिवसैनिकच बंडखोरांना त्यांची जागा दाखवेल! शिवसेना उपनेते गौरीशंकर खोतांचा इशारा

Next

कणकवली : शिवसेनेने सर्वसामान्य लोकांना मोठ्या पदांपर्यंत पोहोचवले आहे. कोण आमदार, तर कोणाला खासदार,मंत्री केले. तेच लोक आता बंडखोरी करत शिवसेना संपवण्याची भाषा करत आहेत. शिवसेना केव्हाही संपणार नाही. कारण, यापूर्वीही अनेक संकटांना तोंड देत शिवसेनेने उभारी घेतली आहे. बंडखोरांना शिवसैनिकच त्यांची जागा दाखवेल असा इशारा शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिला आहे.

तसेच दीपक केसरकर यापुढे पुन्हा निवडून येणार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी शिवसेनेमुळे अपार सत्तेची पदे भोगली आहेत. असेही ते म्हणाले. कणकवली येथील विजय भवन येथे आज, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख निलम सावंत-पालव, कोकण पर्यटन समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, शैलेश भोगले आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

गौरीशंकर खोत म्हणाले,  माझी शिवसेना उपनेते पदी निवड झाली आहे. त्यामुळे जबाबदारी वाढली आहे. शिवसेनेवर आतापर्यंत अनेक संकटे आली. मात्र, भविष्यात शिवसैनिक अजून जिद्दीने काम करतील. जे लोक अपार सत्ता उपभोगून शिवसेनेला बाजूला करत सरकारमध्ये गेले आहेत. त्यांना जागा दाखविण्यात येईल. आमदार केसरकर यांनी किती पक्ष बदलले आहेत, हे जनतेला माहीत आहे. स्वतः मंत्री पदासाठी शिवसेनेत आले. आता शिवसेनेवर टीका करत आहेत. जिल्ह्यातील शिवसेना मजबुत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा गड अभेद्य राहील, असा विश्वास गौरीशंकर खोत यांनी यावेळी व्यक्त केला.

Web Title: Only Shiv Sainik will show the rebels their place! Shiv Sena Deputy Leader Gaurishankar Khota's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.