कुटुंबकल्याण शिबिर प्रस्तावाचीच शस्त्रक्रिया

By Admin | Published: June 23, 2015 12:52 AM2015-06-23T00:52:40+5:302015-06-23T00:52:40+5:30

आरोग्य विभाग : शिबिरांची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव दोन वर्षे धूळ खात पडून

Operation of Family Welfare Camp Proposal | कुटुंबकल्याण शिबिर प्रस्तावाचीच शस्त्रक्रिया

कुटुंबकल्याण शिबिर प्रस्तावाचीच शस्त्रक्रिया

googlenewsNext

रहिम दलाल- रत्नागिरी  -जिल्ह्यातील केवळ ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबकल्याण शिबिरे आयोजित करण्याची शासनाची मंजुरी आहे़ मात्र, जिल्ह्यातील रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्याच्या आणखी १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही शिबिरे अयोजित करण्यासाठीच्या मागणीचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव अतिरिक्त संचालक, कुटुंबकल्याण, पुणे यांच्याकडे गेली दोन वर्षे धूळखात पडला आहे.  जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून आरोग्याबाबतच्या विविध योजना यशस्वीरित्या राबविण्यात येतात़ त्यामुळे आज जिल्ह्याचे आरोग्य उत्तम असल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानामध्ये जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे़ लोकसंख्या वाढीला आळा घातल्यासाठी कुटुंब कल्याण शस्त्रकिया हे उत्तम साधन ठरले आहे़सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लेप्रोस्कोपी कॅम्प फक्त ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा रुग्णालय येथेच घेतले जातात़ जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये या शस्त्रक्रियेची सुविधा असतानाही केवळ जिल्ह्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही शिबिरे घेण्याला आरोग्य संचालकांनी मंजुरी दिली आहे़ त्यामुळे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ही शिबिरे आयोजित करण्यात येतात़ उर्वरित ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शस्त्रक्रियेची सुविधा असतानाही त्यांच्यामध्ये ही शिबिरे घेण्यात येत नाहीत़
लांजा तालुक्यातील लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये कुटुंब कल्याण शिबिर घेण्यात येते़ मात्र, ग्रामीण रुग्णालयामध्ये कोणत्याही सुविधा नसल्याने येणाऱ्या लाभार्थींची, मुलांची व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय होत असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले़ होते.
याबाबत जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेतही जोरदार चर्चा झाली होती़

1एक मुलगी किंवा मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या दांम्पत्याला सावित्रिबाई फुले कल्याण योजनेतून २ हजार रुपये रोख व मुलींच्या नांवे रक्कम ८ हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत स्वरुपात एकूण १० हजार रुपये प्रोत्साहनपर देण्यात येतात. कुटुंब कल्याण कार्यक्रमाला महत्व असताना ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रात ही सुविधा काही केंद्रामध्येच असल्याचे उघड झाल्याने योजनेचा लाभ घेणे अवघड होत आहे.


2जिल्ह्यात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असतानाही जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून रुग्णांना चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शस्त्रक्रियेची सुविधा असतानाही ही शिबिरे घेण्यात येत नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबकल्याणच्या शस्त्रक्रिया होत नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णाला ग्रामीण रुग्णालयामध्ये जावे लागते.



3या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या शस्त्रक्रियेसाठी सर्व सुविधा असल्याने आरोग्य विभागाकडून परवानगी मिळाल्यास कुटुंबकल्याण शिबिरे आयोजित करता येणार आहेत़ त्यामुळे जिल्ह्याचे कुटुंबकल्याणचे उद्दिष्ट पूर्तीसाठी मोठे सहाय्य होणार आहे़ मात्र, आरोग्याचे अतिरिक्त संचालकांकडे प्रस्ताव सादर करुन दोन वर्षे झाली. तरीही तो प्रस्ताव अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. अतिरिक्त संचालकांकडे हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. या प्रस्तावाला मंजूरी कधी मिळणार याकडे आरोग्य विभागाचे लक्ष लागले आहे.


बारा केंद्रांवर शिबिरे घेण्याचा प्रस्ताव
आरोग्य विभागाकडून १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया करण्यास परवानगी उपसंचालकांकडे मागणी करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे केवळ ग्रामीण रुग्णालयातच ही शस्त्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही.
- डॉ. विनित फालके, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.

Web Title: Operation of Family Welfare Camp Proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.