शिवसेनेचे शिलेदार समृद्ध, विरोधकांनी काळजी करू नये; अनिल देसाई यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 04:30 PM2022-05-25T16:30:04+5:302022-05-25T17:03:18+5:30

शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चे अवलोकन करावे. शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही अंगावर घेण्यास तयार

Opposition should not worry about Shiv Sena, MP Anil Desai criticizes the opposition | शिवसेनेचे शिलेदार समृद्ध, विरोधकांनी काळजी करू नये; अनिल देसाई यांचा टोला

शिवसेनेचे शिलेदार समृद्ध, विरोधकांनी काळजी करू नये; अनिल देसाई यांचा टोला

Next

कणकवली : प्रत्येक शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाचा घटक आहे. शिवसेना आणि शिवसेनेचे शिलेदार समृद्ध आहेत. शिवसेना ही समाजकारणाला प्राधान्य देणारी संघटना आहे. शिवसेना काल होती, आज आहे आणि उद्याही असणार आहे. त्यामुळे ज्यांनी शिवसेना सोडली त्यांनी स्वतःचे उद्या काय होईल याची काळजी करावी. शिवसेनेची काळजी करू नये. असा उपरोधिक टोला शिवसेना सचिव तथा खासदार अनिल देसाई यांनी विरोधकांना लगावला.

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या सभागृहात आज, बुधवारी शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आयोजित मेळाव्यात खासदार अनिल देसाई बोलत होते.

खासदार देसाई म्हणाले, एकवेळ तुम्‍ही संपाल पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिवसेना संपविण्याची भाषा करणाऱ्यांना इथल्‍या जनतेनेच जागा दाखवून दिली आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्यांनी आधी स्वत:चे अवलोकन करावे. तसेच शिवसेनेचा कार्यकर्ता कुणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचा इशाराही दिला.

कोविड काळात जीवाची बाजी लाऊन जनतेला शिवसैनिकांनी सेवा दिली. निराधार कुटुंबांना आधार दिला. कोरोनाच्या कठीण काळात राज्याची अर्थव्यवस्था टिकवून ठेवणारे कणखर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला लाभले आहेत. त्यांनी केलेली विकासकामे तसेच त्यांचे विचार घराघरात पोहचवा. तसेच जिल्ह्यातील तिन्ही आमदार शिवसेनेचेच असतील यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले.

केंद्रीयमंत्री राणेंनी किती निधी दिला?

वैभव नाईक म्हणाले, आपली लढाई भाजपाशी आहे. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून ठाकरे सरकारने केलेली कामे गावागावात जाऊन लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात वेगाने परिवर्तन होत आहे. त्यामुळे कणकवली विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेचा विजय नक्की आहे. केंद्रीयमंत्री राणे यांनी वर्षभरात जिल्ह्यात किती निधी दिला ते  जाहीर करावे. केवळ शिवसेनेवर टीका करण्याचे काम राणे कुटुंबीय करतात.

संदेश पारकर म्हणाले, शिवसेना ही एक पेटता निखारा आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी एकजुटीने शिवसंपर्क अभियान यशस्वी करून जनतेपर्यंत शिवसेनेचे विचार पोहचवूया. सतीश सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हापरिषदेत घोटाळ्यांची मालिका सुरु आहे.त्यामुळे येत्या  निवडणुकीत  जिल्हा परिषदेवर भगवा फडकणारच आहे.मात्र, आपणही विजय संपादन करण्यासाठी प्रयत्न करूया.

यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, कोकण पर्यटन विकास समिती उपाध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे, स्वप्नील टेंबुलकर, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, कणकवली तालुका संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Opposition should not worry about Shiv Sena, MP Anil Desai criticizes the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.