डाळींचे साठे तपासणीचे आदेश

By admin | Published: October 24, 2015 12:16 AM2015-10-24T00:16:03+5:302015-10-24T00:20:50+5:30

येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे

Order for inspection of pulses | डाळींचे साठे तपासणीचे आदेश

डाळींचे साठे तपासणीचे आदेश

Next

रत्नागिरी : डाळींचा काळाबाजार तसेच अवैध साठा रोखण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने पावले उचलली असून, राज्यस्तराप्रमाणेच आता जिल्हा स्तरावरही सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागालाही हे आदेश प्राप्त झाले असून, शुक्रवारपासून त्याची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे.डाळींची अवैध साठेबाजी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावरही घाऊक तसेच किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले असून, जिल्हाभर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डाळींच्या साठ्यांबाबत घाऊक विक्रेत्यांना १५०० क्विंटल, तर किरकोळ विक्रेत्यांना १५० क्विंटल इतका साठा मर्यादा शासनाने घालून दिली आहे. त्यामुळे तपासणीत मर्यादेपेक्षा डाळींचा अधिक साठा करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

कोकणात ग्रामीण भागात डाळींचा वापर ठरावीक लोकच करताना दिसतात. शहरातही डाळींचा वापर मर्यादित स्वरूपाचा असतो. रत्नागिरीतील घाऊक दुकानदारांचे प्रमाणही तसे कमी आहे. येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे.---- चंद्रकांत मोहिते, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी.

Web Title: Order for inspection of pulses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.