उंबडेर्तील शुटींगबॉल स्पर्धेत पंजाब खली विजेता, ग्रामसेवा क्रीडा मंडळातर्फे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 12:04 PM2019-03-02T12:04:51+5:302019-03-02T12:06:57+5:30
गरगरत्या चेंडूवरच्या भिरभिरत्या नजरा अन खचाखच भरलेल्या मैदानावरील क्रीडा रसिकांच्या जोशपूर्ण वातावरणात पंजाब खली संघाने उंबर्डेतील राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर आयएससी मालेगाव संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघासह राज्याबाहेरील चार संघ सहभागी झाले होते.
वैभववाडी: गरगरत्या चेंडूवरच्या भिरभिरत्या नजरा अन खचाखच भरलेल्या मैदानावरील क्रीडा रसिकांच्या जोशपूर्ण वातावरणात पंजाब खली संघाने उंबर्डेतील राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तर आयएससी मालेगाव संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत महाराष्ट्रातील नामवंत संघासह राज्याबाहेरील चार संघ सहभागी झाले होते.
उंबर्डे ग्रामसेवा क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यावर्षी ग्रामपंचायत कार्यालयासमोरील मैदानावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सोहळ्याला स्वाभिमान पक्षाचे जिल्हा प्रवक्तेो भालचंद्र साठे, तालुकाध्यक्ष अरविंद रावराणे, नासीर काझी, हर्षदा हरयाण, हुसेन लांजेकर, बाळा हरयाण, प्राची तावडे, शुभांगी पवार, आएशा लांजेकर, द. गो. मुद्रस, एस. पी. परब, डॉ. विजय पांचाळ, जगदीश मोपेरकर आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत यांनी ग्रामसेवा क्रीडा मंडळातर्फे आयोजित केल्या जाणा-या राष्ट्रीय शुटींगबॉल स्पर्धेचे कौतुक करताना ही स्पर्धा जिल्ह्याचे वैभव असल्याचे उद्गार काढले.
या स्पर्धेतून उत्तम राष्ट्रीय खेळाडू तयार होऊन देशात आपल्या जिल्ह्याचे नाव करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी, भालचंद्र साठे, रावराणे मंडळाचे संस्थापक मौलाना महंमदअली मौलवी यांनी मार्गदर्शन केले.
ग्रामसेवा क्रीडा मंडळाचे अध्यक्ष तथा सरपंच एस.एम.बोबडे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या उपक्रमांची माहिती देत देणगीदार व हितचिंतकांचे ऋणी असल्याचे सांगितले. तसेच मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्षा सावंत याचा सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन विजय केळकर यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अड महेश रावराणे, उत्तम सुतार, राजू रावराणे, संजय महाडिक, सुजन दळवी, खुदबुद्दीन रमदूल, सचिन दळवी, किशोर दळवी, रफिक बोबडे, आस्लम पाटणकर, अनिल पाटील, उमर रमदूल, सदानंद दळवी, शहाबुद्दीन नाचरे, आलिबा बोथरे, रजा स्पोर्टस् क्लब, नितीन महाडिक, विजय दळवी, रत्नकांत बंदरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.
पंजाब खली' ने आयएससी मालेगाव'ला नमविले
अटीतटीच्या अंतीम सामन्यात पंजाब खली संघाने आयएससी मालेगाव संघावर मात करुन २५ हजाराचे प्रथम पारितोषिक व चषक पटकावला. तर उपविजेत्या आयएससी मालेगाव संघाला २० हजार रुपये व चषक, तृतीय-कडेपूर-सांगली(१५००० व चषक), चतुर्थ- एस.बी.एम, माळशिरस(सोलापूर-१००००)
पाच ते आठ क्रमांकाच्या धरणमुक्ती कोल्हापूर, खुर्शिद मालेगाव, इस्तियाक मालेगाव आणि अनिस मालेगाव या संघाना प्रत्येकी ३००० उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. याशिवाय उत्कृष्ट शूटर, उत्कृष्ट संघ व उत्कृष्ट नेटमन अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली.