कणकवली महाविद्यालयात 'रानभाज्या महोत्सवा'चे आयोजन; अभिनेते अनिल गवस उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 14:02 IST2022-08-04T14:01:34+5:302022-08-04T14:02:19+5:30
रानभाज्यांचे आरोग्य विषयी महत्त्व काय आहे याविषयीचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य डॉ. निलेश कोदे करणार आहेत.

कणकवली महाविद्यालयात 'रानभाज्या महोत्सवा'चे आयोजन; अभिनेते अनिल गवस उपस्थित राहणार
सुधीर राणे
कणकवली : कणकवली महाविद्यालयात स्नेह सिंधू कृषी पदवीधर संघाच्या १६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येत्या शनिवारी ६ ऑगस्ट रोजी 'रानभाज्या महोत्सवा'चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास स्वराज्य रक्षक संभाजी या टीव्ही मालिकेमधील हंबीर मामा व स्वामिनी मालिकेतील संताजीची भूमिका गाजवणारे अभिनेते अनिल गवस यांची प्रमुख उपस्थितीती असणार आहेत.
कोरोना काळात नागरिकांना आरोग्याचे महत्त्व कळलेले आहेच. रानभाज्यांचे आरोग्य विषयी महत्त्व काय आहे याविषयीचे मार्गदर्शन आयुर्वेदाचार्य डॉ. निलेश कोदे करणार आहेत. या रानभाजी महोत्सवातील प्रदर्शन व पाककला स्पर्धेला कणकवली तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी, महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन स्नेहसिंधु कृषी पदवीधर संघाचे अध्यक्ष हेमंत सावंत व कणकवली कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले यांनी केले आहे.