निबंध व लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:45 PM2017-08-31T12:45:37+5:302017-08-31T12:49:12+5:30

सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, नवी मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी जिल्हास्तर निबंध स्पर्धा व जिल्हास्तर लघुचित्रपट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धा १८ वषार्खालील व १८ वर्षावरील अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील स्पधार्कांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पत्यावर आपले निबंध व लघुचित्रपट दिनांक ५ सप्टेंबर २0१७ पर्यंत पाठवावयाचे आहेत.

Organizing essay and screenwriting competition | निबंध व लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

निबंध व लघुचित्रपट स्पर्धेचे आयोजन

Next
ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षतर्फे स्पर्धा

सिंधुदुर्गनगरी दि. ३१ : पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, नवी मुंबई यांनी सुचित केल्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातर्फे स्वच्छ संकल्पसे स्वच्छ सिध्दी जिल्हास्तर निबंध स्पर्धा व जिल्हास्तर लघुचित्रपट स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आली आहे.
या दोन्ही स्पर्धा १८ वषार्खालील व १८ वर्षावरील अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील स्पधार्कांनी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पत्यावर आपले निबंध व लघुचित्रपट दिनांक ५ सप्टेंबर २0१७ पर्यंत पाठवावयाचे आहेत.


जिल्हास्तर निबंध स्पर्धेकरीता स्वच्छ भारतासाठी मी काय करु शकतो / शकते असा विषय असून निबंधाकरीता कमाल २५0 शब्दांची मर्यादा आहे. निबंधाकरीता भाषा - मराठी, हिंदी इंग्रजी असून सादरीकरण टंकलिखित, हस्तलिखित अथवा स्कॅन कॉपी प्रत्यक्ष कार्यालयात आणून द्यायची आहे. तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या sbmzpsindhudurg@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवावेत.

स्पर्धेकरता १८ वर्षाखालील आणि १८ वर्षावरील गटात १५ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रथम क्रमांकासाठी, व्दितीय क्रमाकासाठी १0 हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि तृतीय क्रमांकासाठी ५ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र अशी बक्षिसे आहेत.


जिल्हास्तरावर लघुचित्रपट स्पर्धेकरीता भारताला स्वच्छ बनविण्यात माझे योगदान हा लघुचित्रपटाकरीता विषय देण्यात आला असून याची वेळ २ ते ३ मिनिटे आहे. लघुचित्रपटाकरीता भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी असून लघुचित्रपटाची सिडी प्रत्यक्ष कार्यालयात आणून देणे अथवा जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या sbmzpsindhudurg@gmail.com या इमेल आयडी वर पाठवायचे आहेत.


१८ वर्षा खालील आणि १८ वर्षावरील गटाकरीता प्रथम क्रमांकासाठी १५ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, व्दितीय क्रमाकासाठी १0 हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय क्रमाकांसाठी ५ हजार सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिस आहे.


निबंध व लघुचित्रपट स्पर्धेकरीता वापरण्यात येणार मजकुर हा स्पर्धकाचा स्वताचा असावा, स्पर्धकाने सादर केलेला निबंध किंवा लघुचित्रपट यावर आक्षेप आल्यास सर्वस्वी स्पर्धक जबाबदार असेल, स्पर्धकांनी वयाबाबत पुरावा देणे आवश्यक आहे.


स्पर्धकांनी आपले निबंध किंवा लघुचित्रपट दिनांक ५ सप्टेंबर २0१७ पर्यंत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या पत्यावर स्वत: पोच करावेत किंवा sbmzpsindhudurg@gmail.com ईमेल आयडीवर पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संतोष पाटील, प्रविण काणकेकर, रुपाजी किनळेकर, संदिप पवार, मनिष पडते, इंदिरा परब यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Organizing essay and screenwriting competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.