सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सिंधुदुर्गनगरीत १३ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन

By admin | Published: May 9, 2017 06:40 PM2017-05-09T18:40:41+5:302017-05-09T18:40:41+5:30

तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार

Organizing workshops on 13th May for the educated unemployed youth in Sindhudurg | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सिंधुदुर्गनगरीत १३ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी सिंधुदुर्गनगरीत १३ मे रोजी कार्यशाळेचे आयोजन

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी, दि. 0९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावोगावी उद्योग- व्यवसाय नसल्याने बरेच सुशिक्षीत बेरोजगार आहेत. सुशिक्षीत बेरोजगारांना कामधंद्याची आवड निर्माण व्हावी तसेच नोक-यांवर अवलंबून न राहता त्यांनी स्वत:चा व्यवसाय किंवा उद्योग त्यांच्या गावात-कार्यक्षेत्रात सुरु करता यावा या उद्देशाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांच्या संकल्पनेतून सुशिक्षीत बेरोजगार वर्गाला मार्गदर्शनपर कार्यशाळा दिनांक १३ मे २0१७ रोजी नविन जिल्हा नियोजन सभागृह येथे सकाळी ठिक ११ वाजता कार्यशाळा आयोजित करण्यात आले आहे.

या कार्यशाळेस समर्थ उद्योग या फेसबुक पेजला भेट देऊन नोंदणी केलेल्या सदस्यांनी उपस्थित रहावे या कार्यशाळेत गावागावातून तयार झालेल्या मालाला शहरातील मोठ्या बाजारपेठा मिळाण्यासाठी या चर्चासत्रात माहिती देण्यात येणार आहे. कार्यशाळेत याबाबत तज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेस जिल्ह्यातील इच्छूक सुशिक्षीत बेरोजगारांनी तसेच स्थानिक उद्योजकांनीही उपस्थित रहावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केले आहे.

Web Title: Organizing workshops on 13th May for the educated unemployed youth in Sindhudurg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.