राजापूर पाठोपाठ दहीबाव येथे गंगातीर्थाचा उगम
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 18, 2024 12:45 PM2024-04-18T12:45:08+5:302024-04-18T12:45:34+5:30
अयोध्याप्रसाद गावकर देवगड : राजापूरची प्रसिद्ध गंगा अवतरली की राजापूर येथील गंगेची सर्व कुंडातून गंगातीर्थ येत असते. ही गंगा ...
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : राजापूरची प्रसिद्ध गंगा अवतरली की राजापूर येथील गंगेची सर्व कुंडातून गंगातीर्थ येत असते. ही गंगा अवतरल्यानंतर जवळपास १५ ते २० दिवसांनी देवगड तालुक्यातील दहीबाव येथेही गंगा अवतरते.
पवित्र गंगेच्या पाण्याने स्थान केल्याने शरीरातील सगळे छोटे-मोठे आजार बरे होतात असे जाणकार सांगतात. शिवाय राजापूर येथील गंगातीर्थाच्या उगमस्थानात उगम झाल्यावर जवळपास पंधरा दिवस ते एक महिना पावसाचा कालावधी हा पुढे सरकतो, असेही जाणकार सांगतात. या गंगातीर्थावर पवित्र स्थान करण्यासाठी अनेक मंडळी दाखल होत असतात. गंगातीर्थावर स्थान करण्याचा आनंद लुटतात.
दहीबाव येथील शेट्ये यांच्या खाजगी जागेत हे गंगाकुंड असून, येथील गंगा कुंडाच्या ठिकाणी असलेल्या गोमातेच्या मुखातून हे गंगातीर्थ येतं आणि हे तीर्थ दुधाळ स्वरूपाचे असते. पाणी पिण्यासही खूप चांगले आहे. मात्र, या गंगातीर्थ ठिकाणी स्वच्छता ठेवणे बंधनकारक आहे. कारण हे ठिकाण पवित्र असल्याने या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी स्वच्छता राखायची आहे, असे आवाहनदेखील येथील शेट्ये मंडळींनी यांनी केले आहे