ओरिसातील चोरट्याला रेल्वेत रंगेहाथ पकडले

By admin | Published: July 3, 2016 11:02 PM2016-07-03T23:02:35+5:302016-07-03T23:02:35+5:30

लोकेंचे प्रसंगावधान : कणकवलीत रेल्वे पोलिसांच्या दिले ताब्यात

Orissa's Choratis caught fire at the railway station | ओरिसातील चोरट्याला रेल्वेत रंगेहाथ पकडले

ओरिसातील चोरट्याला रेल्वेत रंगेहाथ पकडले

Next

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी
जिल्ह्यात यापुढे अवैध धंदे सुरू राहणार नाहीत आणि राहिले तर त्या विभागातील पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नवनियुक्त पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी देताच सर्वच पोलिस अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अधीक्षकांनी दिलेली झलक अवैध धंदेवाईकांच्या पोटात गोळे आणणारी आहे. त्यामुळे अनेकजण सध्या अधीक्षकांच्या पुढील अ‍ॅक्शन प्लॅनकडे लक्ष ठेवून आहेत.
सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षक म्हणून परभणी येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी आठवड्यापूर्वीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. सूत्रे स्वीकारताच त्यांनी जिल्ह्यात अवैध धंदे चालू देणार नाही, असा इशारा पहिल्याच पत्रकार परिषदेत दिला आहे. त्यामुळे अनेक अवैध धंदेवाईक सध्या चिंतेत सापडले आहेत. तत्कालीन पोलिस अधीक्षक के. एस. एम. प्रसन्ना यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक नवीन शिस्त लावून दिली होती. खाकीला या जिल्ह्यात मोठा मानसन्मान मिळत होता.
पण तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रसन्ना यांची बदली झाल्यानंतर नवीन अधीक्षक म्हणून आलेल्या रवींद्र शिसवे यांनीही प्रसन्नांप्रमाणेच खाकी वर्दीतील शिस्त कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतरच्या काळात खाकीला लागलेले ग्रहण अद्यापपर्यंत सुटले नाही. अनेक अधीक्षक आले खरे; पण येथील अवैध धंदे रोखता आले नाही. सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार काहीकाळ अतिरिक्त पोलिस अधीक्षक विनिता साहू यांच्या हाती असताना त्यांनी अवैध धंद्यांवर बऱ्यापैकी हातोडा फिरवला होता. पण नंतर त्यांची बदली झाल्यानंतर अवैध धंद्यांचा गाडा पुढे तसाच सुरू राहिल्याचे दिसून येते.
आता नव्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या अधीक्षकांना अवैध धंद्यांबरोबरच कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान आहे. मागील दोन वर्षात कधी नाही तेवढे अवैध धंद्यांवरून पोलिसदलावर आरोप झाले आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तर पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना अवैध धंद्यांवरून आव्हानच दिले होते. त्यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली होती. पण अवैध धंदे काही कमी झालेले दिसत नव्हते.
जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक मोठ्या प्रमाणात येत आहे. ही अवैध दारू वाहतूक गोव्यातून सिंधुदुर्गात व पुढे मुंबई-सोलापूर या भागात जाते. या अवैध दारू वाहतुकीचे अनेक मार्ग आहेत. पण या वाहतुकीला आतापर्यंत ना उत्पादन शुल्कला आळा घालण्यात यश आले ना पोलिस विभागाला या धंद्यात अनेक युवक सामील झाले आहेत. त्याच्यावर कुणाची जरब राहिली नाही. त्यामुळे बिनधास्त दारू वाहतूक करतात. ही वाहतूक करणाऱ्या गाड्याही निरनिराळ््या आहेत. याची कल्पना ठराविकच पोलिसांना असून त्यांच्याच इशाऱ्यावरून हे सर्व धंदे फोफावत चालले आहेत.
दुसरीकडे गोवा राज्य जवळ असल्याने जिल्ह्यात आता ड्रग्सचे प्रमाणही वाढू लागले आहे. अनेक लहान मुले ड्रग्सच्या आहारी गेली असून त्यांना गोव्यातून तसेच अन्य भागातून ड्रग्सचा पुरवठा होत असतो. एका वर्षापूर्वी गोवा अमली पदार्थ विरोधी पथकाने दोडामार्ग येथे दोघांवर कारवाई केली होती. तर मालवण येथील युवकांवर कर्नाटक अमली पदार्थ विरोधी पथकाने दोन वर्षांपूर्वी कारवाई केली होती. सावंतवाडी पोलिसांनीही निरवडे येथे गोव्यातील दोघांना अंमली पदार्थ विक्रीसाठी सिंधुदुर्गमध्ये आणत असताना पकडले होते. त्यामुळे सिंधुदुर्गवर छुप्या पध्दतीने अंमली पदार्थांचा विळखा असून, त्यातून युवकांना सोडवण्याचे खरे आव्हान अधीक्षकांसमोर ठाकलेले आहे.
जिल्ह्यातील जुगार धंदे कधी नाही ते यावर्षी जत्रेत पाहायला मिळाले. पण जास्त टीका होताच हे धंदे बंद केले. मात्र, छुप्या पध्दतीने काही ठिकाणी जुगार धंदे आजही सुरू आहेत. तसेच मटका राजरोसपणे खेळला जातो. चहाचे स्टॉल जसे उघडावेत तसे मटका घेण्यासाठी पानपट्टी स्टॉल उघडले जात आहेत. एकंदरीतच नव्या अधीक्षकांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांचा अ‍ॅक्शन प्लॅन कसा असणार, याकडेच सर्वांचे डोळे लागून राहिले आहेत. नवीन अधीक्षकांकडून जिल्हावासियांच्या अपेक्षाही मोठ्या आहेत. जिल्ह्यात सावंतवाडी, कुडाळ तसेच कणकवली येथील पोलिस वसाहती मोडकळीस आल्या आहेत. त्यामुळे अनेक पोलिसांना खासगी ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन रहाव्या लागत आहेत. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाबरोबरच अधिकाऱ्यांची निवासस्थानेही मोडकळीस आली असून, काही अधिकाऱ्यांना तर निवासस्थानेच नसल्याचे दिसून येत आहे.
गरज पडल्यास ‘अ‍ॅक्शन स्कॉड’
सिंधुदुर्गवासियांनी मला अवैध धंद्यांबाबत माझ्या कार्यालयाच्या नंबरवर माहिती द्यावी. त्यांचे नाव गुप्त ठेवून निश्चित अशी कारवाई करण्यात येईल. त्यासाठी गरज पडल्यास अ‍ॅक्शन स्कॉडही तयार केले जाईल, असे पोलिस अधीक्षक गावकर यांनी स्पष्ट केले. तसेच अवैध धंदे रोखायचे असतील तर लोकांनीही पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Orissa's Choratis caught fire at the railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.