...अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण

By admin | Published: July 1, 2015 12:37 AM2015-07-01T00:37:14+5:302015-07-01T00:37:14+5:30

मंगेश तळवणेकर यांचा इशारा : डॉ. दुर्भाटकरांची बदली रद्द करण्याची मागणी

... Otherwise the fasting in front of the Guardian's House | ...अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण

...अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण

Next

सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांना कणकवलीत हजर राहण्याचे आदेश प्रभारी शल्यचिकित्सक संजय वंदाळे यांनी दिल्यानंतर माजी सभापती मंगेश तळवणेकर चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी या बदलीविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असून लवकरच मोर्चा काढण्यात येणार असून, जर आंदोलनानंतरही बदली रद्द न झाल्यास पालकमंत्र्यांच्या घरासमोर उपोषण करण्याचा इशारा तळवणेकर यांनी दिला आहे. मोर्चामध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभाग घेतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. दुर्भाटकर यांची महिन्यापूर्वी बदली झाली होती. या बदली विरोधात सावंतवाडीवासीयांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर काही दिवस ही बदली स्थगित ठेवण्यात आली होती. मात्र, मंगळवारी अचानक जिल्हा शल्यचिकित्सक संजय वंदाळे यांनी कणकवलीला डॉ. दुर्भाटकर यांना हजर होण्याचे आदेश दिले. या आदेशाला पुन्हा एकदा विरोध करण्याचे ठरवले आहे. मंगेश तळवणेकर तसेच रिक्षा सेनेचे अतुल मांडकेश्वर यांनी या बदलीला विरोध करण्यात येणार असून, प्रसंगी मोर्चाही काढण्यात येणार असल्याचे सांगितले. हा मोर्चा विठ्ठल मंदिरकडून प्रांताधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार असून, मोर्चा काढल्यानंतरही जर ही बदली रद्द झाली नाही, तर आम्ही पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
डॉ. दुर्भाटकर यांनी गेल्या १२ वर्षात चांगले काम केले असून त्यांची बदली रद्द व्हावी. सावंतवाडी कुटीर रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. असे असताना चांगले डॉक्टर का बदलता, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. (प्रतिनिधी)

कणकवलीत हजर होण्याचे आदेश
दुर्भाटकर प्रकरण : आंदोलनकर्त्यांची मागणी धुडकावली
सावंतवाडी : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची पंधरा दिवसांपूर्वी कणकवली येथे बदली झाली होती. या बदलीला सर्व थरांतून विरोध झाला होता. या विरोधाला न जुमनता पुन्हा एकदा डॉ. दुर्भाटकरांच्या बदलीचे आदेश काढून तातडीने बदलीच्या जागी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक संजय वंदाळे यांनी काढले आहेत. त्यामुळे लोकांची मागणी धुडकावत हा आदेश काढल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांची कणकवली येथे बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी दोडामार्ग येथील डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे यांची नेमणूक करण्यात आली आहे.
ही बदली एक महिन्यापूर्वी झाली असून डॉ. दुर्भाटकर यांच्या बदलीचे आदेश निघाल्यानंतर सावंतवाडीतील नागरिकांनी तसेच नगरसेवकांनी तीव्र आंदोलन छेडले होते. या आंदोलनानंतर बदलीला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, ही स्थगिती दिल्यानंतरही डॉ. ऐवाळे यांना उपजिल्हा रुग्णालयात नेमणूक देण्यात आली होती. या प्रकारानंतर गेले पंधरा दिवसानंतर हे प्रकरण शांत होते. मात्र, अचानक मंगळवारी प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक संजय वंदाळे यांनी डॉ. दुभाटकर यांना कणकवली येथे रुजू व्हा, असे आदेश दिले आहेत.
या ओदशानंतर आता सावंतवाडीतील नागरिक काय भूमिका घेतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण डॉ. दुर्भाटकरांच्या बदलीनंतर सावंतवाडीत सर्वपक्षीय नागरिकांनी तीव्र आंदोलन छेडले होते. लोकांच्या मागणी नंतरही त्यांची बदली करण्यात आली
आहे. त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: ... Otherwise the fasting in front of the Guardian's House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.