'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

By अनंत खं.जाधव | Published: September 24, 2022 07:54 AM2022-09-24T07:54:58+5:302022-09-24T07:56:08+5:30

विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न: माडखोल येथील प्रकार 

Out of anger over non-payment of fees, misbehavior, suicide attempt by student | 'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

'फी' न दिल्याच्या रागातून शाळा प्रशासनाची हिन वागणूक, विद्यार्थ्याकडून आत्महत्येचा प्रयत्न

Next

सावंतवाडी : फी न दिल्याच्या रागातून शाळेच्या प्रशासकीयअधिकार्‍याकडून हीन वागणूक मिळाल्याच्या नैराश्यातून माडखोल येथील एका महाविद्यालयाच्या विदयार्थ्याने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र वेळीच हा प्रकार घरातील व्यक्तीच्या लक्षात आल्यामुळे त्याला छप्पराची कौले काढून वाचविण्यात यश आले हा प्रकार शुक्रवारी सायंकाळी माडखोल येथे घडला. या प्रकाराची गंभीर दखल ग्रामस्थांसह शिवसेनेकडून घेण्यात आली असून संबधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

माडखोल येथे एक महाविद्यालय आहे. त्या ठिकाणी गावातील स्थानिक विद्यार्थी दुसर्‍या वर्षासाठी शिक्षण घेत होता. त्याने गेले काही महिने फी भरली नव्हती. त्यामुळे संबधित महाविद्यालयच्या प्रशासकीय अधिकार्‍याने फी साठी त्याच्याकडे तगादा लावला होता. तसेच वारंवार फी न दिल्यामुळे त्याला तुम्ही गरीब आहात, भिकारी होता, तर एवढे महागडे शिक्षण कशासाठी घेत होता, असा प्रश्न करून त्या युवकाला त्रास दिला जात होता.
आज सकाळी सुध्दा असाच प्रकार घडला. यावेळी मानसिक नैराश्य आल्यामुळे त्या युवकाने आई-बाबा मला माफ करा, अशी चिठ्ठी लिहून ठेवत आपल्या घरातील पडवीत साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा प्रकार करण्यापुर्वी चिठ्ठी दरवाजावर चिकटवली होती. त्यामुळे घरातील व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून  त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तोडण्यास ते असमर्थ ठरले. यावेळी छप्पराची कौले काढुन त्याला वाचविण्यास यश आले.

या प्रकाराने भयभीत झालेल्या घरातील व्यक्तीसह शेजार्‍यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत या प्रकारा विरोधात सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेतली. झालेला प्रकार हा योग्य नाही, काही झाले तरी संबधित प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच संबधितांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ व बाळा गावडे यांनी केला. या प्रकारानंतर  राऊळ म्हणाले, असा प्रकार होणे दुर्दैवी आहे, पुन्हा घडल्यास संबधित संस्थेला टाळे ठोकू असा इशाराही  त्यांनी यावेळी दिला आहे.

Web Title: Out of anger over non-payment of fees, misbehavior, suicide attempt by student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.