सह्याद्रीच्या पट्ट्यात भातपेरणीला दमदार सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 05:29 PM2021-06-02T17:29:41+5:302021-06-02T17:31:47+5:30

Agriculture Sector Sindhudurg : कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये मान्सूनपूर्व पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी पॉवर टिलरच्या सहाय्याने पेरणी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

Paddy sowing started in Sahyadri belt | सह्याद्रीच्या पट्ट्यात भातपेरणीला दमदार सुरुवात

नाटळ येथे शेतकरी शेतीच्या कामात मग्न झालेला दिसत आहे.

Next
ठळक मुद्देसह्याद्रीच्या पट्ट्यात भातपेरणीला दमदार सुरुवात यांत्रिकीकरणावर भर : शेतकरी पेरणीच्या कामात मग्न

कनेडी : कणकवली तालुक्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये मान्सूनपूर्व पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांनी पॉवर टिलरच्या सहाय्याने पेरणी केल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.

सह्याद्रीच्या पट्ट्यातील नरडवे, दिगवळे, दारिस्ते, नाटळ, कुंभवडे, हरकुळ खुर्द, हरकुळ बुद्रुक, सांगवे, भिरवंडे, शिवडाव या गावांमधील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला बगल देत यांत्रिकीकरणाचा वापर करीत व्यावसायिक तत्त्वावर भर दिलेला दिसत आहे.

पारंपरिक बैलजोड्यांच्या सध्याच्या युगात किमती वाढलेल्या आहेत. या अमाप वाढीमुळे शेतकऱ्यांना ते परवडणारे नाहीत. शेतकऱ्यांऱ्या खिशाला एकप्रकारे कात्रीच लागलेली दिसत आहे. गेला महिनाभर दोन - चार दिवसाआड वरुणराजा बरसतच आहे. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे रेंगाळली होती. तौक्ते चक्रीवादळाने आर्थिक संकटात सापडलेल्या या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल का, याची चिंता वाटत आहे. कोरोना महामारीने तर शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडेच मोडून टाकले आहे.

चक्रीवादळानंतर काही दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी मशागतीची कामे संपवली होती. त्यानंतर शेतीयोग्य पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग शेतीच्या कामात गुंतल्याचे दृश्य दिसत आहे.

 

Web Title: Paddy sowing started in Sahyadri belt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.