मारहाणप्रकरणी पंधराजणांना जामीन

By admin | Published: December 23, 2014 12:39 AM2014-12-23T00:39:17+5:302014-12-23T00:56:17+5:30

पाच हजार रुपयांच्या जामिनावर सुटका

Pandharpura bail plea | मारहाणप्रकरणी पंधराजणांना जामीन

मारहाणप्रकरणी पंधराजणांना जामीन

Next

सावंतवाडी : वेर्ले-कदमवाडी येथील सदाशिव सोनू कदम यांना मारहाण केल्याप्रकरणी पुंडलिक तुकाराम कदम यांच्यासह पंधरा जणांवर रविवारी रात्री सावंतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोमवारी त्यांना अटक करून येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. वेर्ले-कदमवाडी येथील सदाशिव सोनू कदम तेथीलच यांना पुंडलिक तुकाराम कदम (वय ४१), दत्तप्रसाद पुंडलिक कदम (वय २३), नामदेव न्हानू कदम (वय २७), अमित मोहन कदम (वय २८), सुनील सीताराम कदम (वय १९), संदीप अशोक नाईक, मनोहर सुकाजी कदम (वय ४५), ममता मनोहर कदम (वय ४५), सुजाता सीताराम कदम (वय ४०), समीर विजय नाईक (वय २१), शशिकांत सोमा नाईक (वय ५०), चंद्रभागा पुंडलिक कदम (वय ४५), जयश्री तुकाराम कदम (वय ६०), सुषमा भगवान कदम (वय ४५), धोंडी रामा कदम (वय २३) या सर्वांनी मारहाण केल्याची तक्रार सदाशिव कदम यांनी सावंतवाडी पोलिसात दिली होती.
या मारहाणप्रकरणी या पंधरा जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या सर्वांना सोमवारी हेडकॉन्स्टेबल संजय हुंंबे यांनी वेर्ले येथे अटक करून न्यायालयात हजर केले असता प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या जामिनावर सर्वांची सुटका करण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Pandharpura bail plea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.