परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 05:14 PM2020-12-03T17:14:05+5:302020-12-03T17:15:42+5:30

Bhalchandra maharaj temple Kankavali, Religious Places, sindhudurg असंख्य भाविकाचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सव कालावधीत होणारे सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. मात्र महाप्रसाद तसेच व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

Paramahansa Bhalchandra Maharaj Punyatithi Mahotsav from 17th December! | परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!

परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!

googlenewsNext
ठळक मुद्देपरमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबर पासून!शासकीय नियम पाळून साधेपणाने होणार साजरा

कणकवली : असंख्य भाविकाचे श्रध्दास्थान परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४३ वा पुण्यतिथी महोत्सव १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत कोरोना संसर्ग टाळण्यासाठी शासकीय नियम पाळून अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सव कालावधीत होणारे सर्व धार्मिक विधी केले जाणार आहेत. मात्र महाप्रसाद तसेच व्यासपीठावरील सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

परमहंस भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी आणि जयंती महोत्सव दरवर्षी भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला जात असतो. मात्र यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे परमहंस भालचंद्र महाराज संस्थान कमिटीने पुण्यतिथी महोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

१७ ते २० डिसेंबर या कालावधीत पहाटे ५.३० ते ७.३० या वेळेत समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८.३० ते १२.३० सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी ह्यभालचंद्र महारूद्र महाअभिषेक अनुष्ठानह्ण दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भजन मंडळांची भजने, सायंकाळी ७ वाजता धुपारती, रात्री ८ वाजता बाबांची दैनंदिन आरती होणार आहे.

तर परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४३ व्या पुण्यतिथी दिनी २१ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता समाधीपूजन, काकड आरती, सकाळी ८ वाजता भजने, १०.३० वाजता समाधीस्थानी श्रींची राजोपचार महापूजा, दुपारी १२.३० ते १ आरती, १ ते ५ भजने, सायंकाळी ५ वाजता संस्थान परिसरात भाविकांच्या मर्यादीत उपस्थितीत परमहंस भालचंद्र महाराज यांची पालखी मिरवणूक, रात्री ८ वाजता दैनंदिन आरती आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी महोत्सवास येणार्‍या भाविकांनी शासकीय नियम व शिस्त पाळणे आवश्यक आहे. संस्थान परिसरात व समाधीस्थानी मास्क लावून शिवाय योग्य अंतर ठेवून दर्शन घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे भाविकांनी गर्दी टाळावी. कोरोना पार्श्वभूमीवर महाप्रसाद तसेच सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन संस्थानच्यावतीने अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.
 

 

 

 

Web Title: Paramahansa Bhalchandra Maharaj Punyatithi Mahotsav from 17th December!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.