कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:30 PM2019-11-15T12:30:58+5:302019-11-15T12:49:39+5:30

परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

Paramhansa Bhalchandra Maharaj Punyatithi Festival in Kankavali from November 29! | कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !

कणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवली येथे २९ नोव्हेंबर पासून परमहंस भालचंद्र महाराज पुण्यतिथी महोत्सव !कणकवली शहरातून काढली जाणार भव्य मिरवणूक, चार दिवस कीर्तन महोत्सव !

कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज यांचा ४२ वा पुण्यतिथी महोत्सव २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत येथील आश्रमात साजरा केला जाणारा आहे . त्यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्ताने २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत पहाटे समाधी पूजन , काकड आरती , सर्व भक्त कल्याणार्थ धार्मिक विधी , भालचंद्र महारुद्र महाअभिषेक अनुष्ठान , दुपारी आरती, महाप्रसाद आणि भजनांचा व सायंकाळी ४ वाजता कीर्तन महोत्सव व रात्री ८ वाजता दैनंदिन आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

३ डिसेंबर रोजी पुण्यतिथी दिन असून पहाटे समाधी पूजन , काकड आरती, जपानुष्ठान, भजने त्यानंतर समाधीस्थानी मन्यसुक्‍त पंचामृताभिषेक विधी होणार आहे. दुपारी १ वाजता महाप्रसाद व भजने, सायंकाळी ५ वाजता परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी सांप्रदाय यांच्या समवेत कणकवली शहरातून भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. त्यानंतर आरती होणार असून रात्री १२ वाजल्यानंतर हळवल येथील भालचंद्र दशावतार नाटयमंडळ यांचे दशावतारी नाटक होणार आहे.

या पुण्यतिथी उत्सवाला भाविकांनी उपस्थित रहावे . असे आवाहन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.

चार दिवस कीर्तन महोत्सव !

या पुण्यतिथी उत्सवानिमित्त कीर्तन महोत्सव होणार असून २९ नोव्हेंबर रोजी पुणे येथील ह .भ.प. किर्तनचंद्र श्रेयस बडवे यांचे ' नामदेवांना सदगुरु दर्शन' , ३० नोव्हेंबर रोजी पुणे येथील ह. भ. प. रेशीम खेडकर यांचे ' संत सावतामाळी' , १ डिसेंबर रोजी मुंबई येथील ह.भ.प. वेदश्री ओक यांचे ' संत भानुदास महाराज' तर २ डिसेंबर रोजी अहमदनगर येथील ह.भ. प. प्रभंजन भगत यांचे ' राखा कुंभार ' या विषयावर कीर्तन होणार आहे. त्यांना हार्मोनियम साथ माधव गावकर, तबला शिवाजी पवार तर पखवाज साथ गजानन देसाई करणार आहेत.

 

Web Title: Paramhansa Bhalchandra Maharaj Punyatithi Festival in Kankavali from November 29!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.