अ‍ॅडमिशनच्या नावाखाली शासनाचा निधी लाटण्याचाच डाव; बबन साळगावकर आक्रमक

By अनंत खं.जाधव | Published: February 3, 2023 12:09 AM2023-02-03T00:09:09+5:302023-02-03T00:09:54+5:30

सावंतवाडीतील प्रबोधिनी का हलवली? नोकर भरती ,सेटअप बॉक्स, मोफत वायफाय लोकांपर्यंत पोहचले नाही ही लोकांची फसवणूक झाली आहे.

प्रवेशाच्या नावाखाली सरकारी निधी हडपण्याचा डाव, बबन साळगावकर यांचा आरोप | अ‍ॅडमिशनच्या नावाखाली शासनाचा निधी लाटण्याचाच डाव; बबन साळगावकर आक्रमक

अ‍ॅडमिशनच्या नावाखाली शासनाचा निधी लाटण्याचाच डाव; बबन साळगावकर आक्रमक

Next

सावंतवाडी : सावंतवाडी येथील बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी ओरोस येथे हलविण्याचे कारण आम्हाला अद्यापपर्यंत समजू शकले नाही.या ज्ञानप्रबोधिनी साठी दिलेला निधी वाया गेला आता ओरोस येथे अ‍ॅडमिशन च्या नावाखाली सेंटर उभारण्यामागे शासनाचा निधी लाटण्याचाच प्रकार आहे का?याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली.आम्ही दोन दिवसात सावंतवाडीतील ज्ञान प्रबोधिनी ला धडक देऊन यांची माहिती घेणार असल्याचे ही साळगावकर यांनी सांगितले.

साळगावकर म्हणाले, नोकर भरती ,सेटअप बॉक्स, मोफत वायफाय लोकांपर्यंत पोहचले नाही ही लोकांची फसवणूक झाली आहे. उद्योजक व एक मराठी माणूस म्हणून आपल्याला हर्ष साबळे यांचा अभिमान आहे, मात्र त्यांनी येथील जनतेला खासकरुन येथील बेरोजगार युवकांना नोकरीची आमिषे दाखवून का फसवावे, त्यांची नेमकी कोणती कमजोरी आहे असे ते सतत का करतात.

त्यांनी याठिकाणी सुरु केलेल्या ॲडमिशनच्या नावाने दोनवेळा युवकांची फसवणूक केली.  येथील युवकांसाठी एमपीएससी यूपीएससी स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सुरू केलेले बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनी सेंटरही केव्हाच या ठिकाणावरून दुसरीकडे हलवले मात्र त्याची साधी भनकही जनतेला नाही, अलीकडेच येथे सुरू केलेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या आडून हा प्रकार त्यांनी केला त्यामुळे  साबळे यांना नेमका या ठिकाणी कोण खेळवत आहे याचा शोध आता घ्यावाच लागेल असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

साळगावकर म्हणाले ऍडमिशनच्या नावाखाली अलीकडेच या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे अमित दाखवण्यात आले परंतु हा मिळावा खरोखरच येथील बेरोजगार युवकांची श्रेष्ठ करणार आहोत सहज उपलब्ध होणारी दहा हजाराची नोकरी या ठिकाणच्या मेळाव्यात देऊन त्यांनी फसवणूक केली. तर दुसरीकडे चांदा ते बांदा या योजनेतून गिर गाईंचे स्वप्नही येथील जनतेला दाखवण्यात आले.असे ही ते यावेळी म्हणाले.

Web Title: प्रवेशाच्या नावाखाली सरकारी निधी हडपण्याचा डाव, बबन साळगावकर यांचा आरोप

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.