छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या शासन निर्णयामध्ये अंशत: बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:04 PM2017-07-24T18:04:48+5:302017-07-24T18:04:48+5:30
१ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांनाही मिळणार लाभ
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी दि. २४ : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ जाहीर करण्यात आले असून राज्यातील शेतक-यांच्या कर्जमाफी योजनेबाबतचा तपशिल देण्यात आलेला आहे. आता संदर्भ क्र. 0२ अन्वये मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २0१७ च्या योजना निकषात बदल करुन दिनांक १ एप्रिल २00९ रोजी वा त्यानंतर कर्ज घेतलेल्या शेतक-यांना ही योजना लागू करण्यात येईल अशी घोषणा केल्यामुळे शासन निर्णयामध्ये तशी सुधारणा करण्यात आली आहे.
या शासन निर्णयातील योजनेचा तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ मधील दुसऱ्या ओळीत दिनांक 0१ एप्रिल २0१२ या शब्दाऐवजी दिनांक १ एप्रिल २00९ असा बदल करण्यात आला आहे. शासन निर्णयातील योजनेच्या तपशिल या मथळ्याखाली अ.क्र.0२ (ड) मधील पहिल्या ओळीत २0१२-१३ या शब्दाऐवजी २00९-१0 असा बदल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे दि. ३0 जून २0१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना खरीप पिकासाठी निविष्ठा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने १0 हजार रुपये मयार्देपर्यत शासन हमीवर बॅकांनी तातडीने कर्ज देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला असून त्यामध्ये संदर्भ क्र. ४ चे शासन निर्णयानुसार सुधारणा बदल करण्यास आलेली असून त्यानुसार राज्यातील दिनांक १ एप्रिल २00९ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतक-यांना या शासन निर्णयाप्रमाणे लाभ घेता येईल असे जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.