रत्नागिरी गॅस पॉवर प्रकल्पाचे विभाजन
By Admin | Published: September 16, 2016 11:21 PM2016-09-16T23:21:40+5:302016-09-16T23:42:23+5:30
मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय : रत्नागिरी गॅस अँड पॉवर, कोकण एलएनजी प्रा. लि. कंपनीचा समावेश
रत्नागिरी : गुहागर तालुक्यातील दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. (फॠढढछ) या प्रकल्पाचे विभाजन (ऊीेी१ॅी१) करून रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. (वीज निर्मिती कंपनी) आणि कोकण एलएनजी प्रा. लि. (गॅस टर्मिनल कंपनी) या दोन स्वतंत्र कंपन्या निर्माण करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
दाभोळ येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. हा वायुवर आधारित बंद पडलेला वीज निर्मिती प्रकल्प केंद्र शासनाच्या पॉवर सिस्टिम डेव्हलपमेंट फंड (ढरऊऋ) योजनेंतर्गत २६ नोव्हेंबर २०१५ पासून पुनरुज्जीवित करण्यात आला. प्रकल्प पुनरूज्जीवित करण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून अनेक निर्णय घेण्यात आले असून, या कंपनीच्या विभाजनाचा निर्णयही त्यापैकीच एक आहे. या प्रस्तावित विभाजनामुळे शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
आरजीपीपीएल प्रकल्पामधून सद्य:स्थितीत ५०० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होत आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज रिव्हर्स बिडिंग (फी५ी१२ी इ्र्रििल्लॅ) प्रणालीद्वारे घेण्यासाठी रेल्वेची निवड झाली असल्याने संपूर्ण विजेचा पुरवठा रेल्वेला होत आहे. या प्रकल्पातील विजेचा दर माफक ठेवण्यासाठी राज्य शासनाकडून व्हॅट, सीएसटी व पारेषण आकार यामधून सूट देण्यात आली आहे. मात्र, प्रकल्पामधील एलएनजी टर्मिनलचा वापर पूर्ण क्षमतेने होत नसल्याने आरजीपीपीएल कंपनीला त्यांच्यावर असलेल्या कर्जाची परतफेड वेळेत करता येत नव्हती. त्यामुळे आरजीपीपीएल ही राष्ट्रीय संपत्ती अनुत्पादक मालमत्ता (ठङ्मल्ल ढी१ाङ्म१े्रल्लॅ अ२२ी३२) घोषित होण्यापासून टाळण्यासाठी आरजीपीपीएल प्रकल्पाचे विभाजन (ऊीेी१ॅी१) करून विद्युत निर्मिती केंद्र व आरएलएनजी (फछठॠ) टर्मिनल या स्वतंत्र कंपन्या करण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
कर्ज पुरवठादार बँकाही होत्या आग्रही...
या प्रकल्पाच्या विभाजनाबाबत कर्ज पुरवठादार बँकाही आग्रही होत्या. कर्जाचे समभागात रूपांतर केल्यानंतर आरजीपीपीएल कंपनीकडे ३८२०.२७ कोटी रुपये इतके भागभांडवल आहे.
या कंपनीचा समभाग भांडवलामध्ये महाराष्ट्र शासनाचा एमएसईबी होल्डिंग कंपनीमार्फत १३.५१ टक्के म्हणजे ५१६.२८ कोटी एवढा वाटा आहे.
कंपनीच्या विभाजनानंतर मे. गेल व एनटीपीसी यांनी संयुक्तपणे अतिरिक्त भागभांडवल गुंतवणूक केल्यास आरजीपीपीएल कंपनीमध्ये एमएसईबी होल्डिंग कंपनीचे समभाग १३.५१ टक्के आणि कोकण एलएनजी प्रा. लि. या कंपनीमध्ये ४.१० टक्के (७४.0५ कोटी) इतके राहणार आहे.
आजच्या निर्णयानुसार रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. या कंपनीच्या भागधारकांमध्ये करार करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या कंपनीमार्फत सचिव (ऊर्जा) यांना प्राधिकृत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच, रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रा. लि. कंपनीच्या विभाजन प्रस्तावात काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास त्याची मान्यता देण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळास देण्यात आला आहे.