परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकर
By admin | Published: November 16, 2015 10:44 PM2015-11-16T22:44:39+5:302015-11-17T00:01:43+5:30
आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे. आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या
कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत
आहेत. (प्रतिनिधी)
परुळेकरांचा राजकीय द्वेषापोटी
आरोंदा जेटीला विरोध : पेडणेकर
सिंधुदुर्गनगरी : काँग्रेस प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे केवळ राजकीय द्वेषापोटी आरोंदा जेटीला विरोध दर्शवून स्थानिकांमध्ये भांडणे लावण्याचे काम करीत आहेत. भांडणे लावण्यापेक्षा त्यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. लोकांना भडकविण्याचे काम करू नका अन्यथा आपल्याविरोधात आम्हांला रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर यांच्यासह आरोंदा ग्रामस्थांनी दिला आहे.
आरोंदा जेटीसंदर्भात सोमवारी आरोेंदा ग्रामस्थ व मच्छिमारांनी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत नाईक, वासुदेव कोचरेकर, आनंद परब, राजेश नाईक, तुळशीदास कुबल, भगवान नाईक, ज्ञानदेव नाईक, संतोष नाईक, गोपाळ नाईक, राजाराम रेडकर यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ व मच्छिमार उपस्थित होते. तर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर शंभराहून अधिक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
आरोंदा येथील जेटीचे काम व्हाईट आॅर्चिड प्रा. लि. कंपनीकडून सुरु आहे. या जेटीवर अनेक बेरोजगार तरुण अवलंबून आहेत. ज्यांना रोजीरोटी नाही अशांना रोजगारांची संधी जेटीच्या स्वरुपात प्राप्त झाली आहे. मात्र गेली दोन वर्षे या जेटीसंदर्भात राजकीय संघर्षाचे वळण लागल्याने जेटीला प्रोत्साहन मिळत नाही. तरी स्थानिक लोकांच्या बेरोजगारीचा विचार करूनही जेटी चालू होण्याच्या दृष्टीने पावले उचलावीत अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी ग्रामपंचायत सदस्य राजेश पेडणेकर म्हणाले की, आरोंदा जेटी झाल्यास कित्येकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. आजही ७० ते ८० किलोमीटर प्रवास करून आरोंद्यातील तरुण नोकरीसाठी गोव्याला जात आहेत. ही जेटी झाल्यास या तरुणांना येथेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. मात्र सध्या आरोंदा जेटीसंदर्भात नाहक राजकारण केले जात आहे. या राजकीय संघर्षात आरोंदावासिय, ग्रामस्थ व मच्छिमार भरडले जात आहेत. तत्कालीन पालकमंत्री नारायण राणे यांनी आरोंदा जेटीला मान्यता देऊन चांगले काम केले. त्यांचे आम्ही अभिनंदनच करतो. पण काँग्रेसचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर हे आरोंदा जेटीच्या
कामात राजकारण करून ग्रामस्थांमध्ये तंटे लावण्याचे काम करत
आहेत. (प्रतिनिधी)