तिघांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले; मडुरा स्थानकातून प्रवाशांचे पलायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 05:35 PM2020-05-24T17:35:51+5:302020-05-24T17:36:04+5:30

रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो.

 Passenger escape from Madura station | तिघांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले; मडुरा स्थानकातून प्रवाशांचे पलायन

तिघांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले; मडुरा स्थानकातून प्रवाशांचे पलायन

Next
ठळक मुद्देराजधानी एक्स्प्रेसमधून करीत होते प्रवास :

बांदा : दिल्लीकडून मडगावकडे जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमधून मडुरा रेल्वे स्थानकानजीक कर्नाटकचे २५ हून अधिक प्रवासी उतरून जंगलात पसार झाले. त्यापैकी ३ प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले. राजधानी एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडुरा स्थानकानजीक थांबली असता २५ हून अधिक प्रवाशांनी जंगलात पळ काढला. बांदा पोलिसांनी रितसर पास असल्याने त्या तीन प्रवाशांना गोव्यात जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

रेल्वे गार्डने याबाबत रेल्वे स्थानकावर माहिती देताच एकच खळबळ उडाली. स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले. आपण भटकळ (कर्नाटक) येथील रहिवासी असून दिल्लीला गेलो होतो. मडगाव रेल्वे स्थानकावर क्वारंटाईन होण्याच्या भीतीने आपण मडु-यात उतरल्याचे तिघांनी सांगितले.

घटनास्थळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच भिकाजी केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, प्रकाश गावडे, यशवंत कुबल, सुदीन गावडे, पोलीस पाटील निर्जरा परब उपस्थित होते. याबाबत माहिती मिळताच तेथे बांदा पोलीस दाखल झाले. बांदा पोलिसांनी त्या परप्रांतीय कामगारांची चौकशी केली.

मडुरा रेल्वे स्थानकाला मडगांव स्थानक समजून कर्नाटकचे ते प्रवासी उतरले. काही क्षणांत रेल्वे मार्गस्थ झाली. त्यानंतर त्या प्रवाशांना आपण चुकीच्या रेल्वे स्थानकांत उतरलो असल्याचे लक्षात आले. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी जंगलातून गोव्याच्या दिशेने पलायन केले.

कर्नाटकमधून नेण्यासाठी येणार
दिल्लीकडून मडगावकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस क्रॉसिंगसाठी मडुरा स्थानकानजीक थांबली. त्यातील तिघांना स्थानिकांनी पकडले. त्यांच्याकडे रितसर पास असल्याने त्या तिघांना गोव्यात जाण्यासाठी परवानगी देण्यात आले. इतरही प्रवाशांनी आपल्याकडे पास असल्याचे सांगितले. त्या प्रवाशांना कर्नाटक सरकारकडून नेण्यात येणार आहे, अशी माहिती बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली.

स्थानिक ग्रामस्थांनी शोधाशोध केली असता तिघेजण रोणापाल ग्रामस्थांच्या तावडीत सापडले आहेत.

Web Title:  Passenger escape from Madura station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.