विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको !

By admin | Published: August 10, 2015 08:36 PM2015-08-10T20:36:03+5:302015-08-10T20:36:03+5:30

सतीश सावंत : वैभववाडी ग्रामीण पतसंस्थेच्यावतीने सत्कार

Pay 'untransfer' loan; But do not 'cause' no! | विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको !

विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको !

Next

वैभववाडी : विनाकारण दिलेले कर्ज बुडण्याची शक्यता अधिक असून अशी कर्ज मागणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सहकार कायद्यातील बदल स्वीकारून पतसंस्था टिकवायच्या असतील तर एकवेळ विना‘तारण’ कर्ज द्या; पण विना‘कारण’ नको, असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी आज येथे वैभववाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात दिला.येथील सुवर्णा मंगल कार्यालयात वैभववाडी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची सर्वसाधारण सभा झाली. यावेळी सतीश सावंत यांचा पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. सभेला पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम रावराणे, दत्ताराम साटम, सज्जन रावराणे शाळिग्राम रावराणे, संदीप पाटील, दिगंबर सावंत, संजय रावराणे, मनोज सावंत, सुधीर खांबल आदी उपस्थित होते.सावंत पुढे म्हणाले, पतसंस्था काढणे सोपे आहे. पण त्या चालविणे कठीण काम आहे. अशावेळी उतारवयातील लोकांनी २७ वर्षे पतसंस्था चालवून नवा आदर्श निर्माण केला आहे. यातून पतसंस्थेने ठेवीदारांचा विश्वास आणि हित जपले आहे. हे सिध्द होते.संस्थेला नफा किती मिळाला. आॅडिट वर्ग काय मिळाला, यापेक्षा संस्थेने किती बेरोजगारांनाधंदा, व्यवसायात उभं केले हे महत्त्वाचे आहे. सहकार कायद्यातील बदलामुळे पतसंस्था चालवणे कठीण झाले आहे.पतसंस्था या जिल्हा बँकेच्या मालक आहेत. जिल्हा बँक राष्ट्रीयीकृत बँकांच्या बरोबरीने सेवा सुविधा देत आहे. त्यामुळे पतसंस्थांच्या ठेवी अन्य बँकांकडे जात असतील तर ते योग्य नाही. जिल्हा बँकेचा उत्कर्ष पतसंस्थांच्या हातात आहे. त्यामुळे पतसंस्था आणि बँक एकत्र येऊन सहकार चळवळ वृध्दींगत करुया, असे आवाहन सावंत यांनी केले. तसेच २७ वर्षे पूर्ण झालेल्या वैभववाडी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या सत्काराने माझा सन्मान वाढविला असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

क्रेडिट कार्ड सुविधा लवकरच
सिंधुदुर्ग बँक ही २९ एटीएम केंद्र असणारी एकमेव सहकारी जिल्हा बँक आहे. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना जिल्ह्याबाहेर कुठेही खरेदीसाठी जाताना प्रवासात पैसे सांभाळण्याची कटकट नको म्हणून सिंधुदुर्ग बँक लवकरच आपल्या ग्राहकांना क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून देणार आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली.

Web Title: Pay 'untransfer' loan; But do not 'cause' no!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.