सावंतवाडी पंचायत समितीमध्ये ३१ आॅगस्ट रोजी पेन्शन अदालत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:39 PM2017-08-28T16:39:47+5:302017-08-28T16:39:47+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. २८ : सावंतवाडी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये (सेवानिवृत्त जिल्हा परिषद कर्मचारी) गुरुवार दिनांक ३१ आॅगस्ट २0१७ रोजी सकाळी ११ ते दुपारी १.३0 या वेळेत पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील बांधकाम उपविभाग, लघु पाटबंधारे उपविभाग, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग, शिक्षण विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, तालुका आरोग्य अधिकारी, पशुसंवर्धन विभाग तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राकडील जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत व अद्यापि निवृत्तीविषयक लाभ देण्याचे प्रलंबित आहेत, अशा कर्मचा-यांनी त्याबाबतची लेखी निवेदने घेऊन पेन्शन अदालत कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाºयांनी केले आहे.