कणकवलीवासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 03:35 PM2020-11-28T15:35:56+5:302020-11-28T15:39:26+5:30

indianarmy, kankavli, sindhudurngews, 26/11 terror attack मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना गुरूवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली.

People of Kankavali pay homage to martyrs of 26/11! | कणकवलीवासीयांनी २६/११ तील शहिदांना वाहिली आदरांजली !

 कणकवली पोलिस ठाण्याच्या परिसरात २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली कणकवलीकरानी आदरांजली वाहिली.

googlenewsNext
ठळक मुद्देकणकवलीवासीयांनी २६ / ११ तील शहिदांना वाहिली आदरांजली ! नागरिकांनी घेतली संविधानाची शपथ

कणकवली : मुंबई येथील २६ /११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांना गुरूवारी संविधानदिनी कणकवलीवासीयांनी आदरांजली वाहिली. कणकवली पोलीस ठाण्याच्या आवारात वंदे मातरम लिहत मेणबत्ती प्रज्वलित करून उपस्थित सर्व नागरिक नतमस्तक झाले. तसेच यावेळी संविधानाची शपथही घेण्यात आली.

"आम्ही कणकवलीकर" यांच्यावतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मेणबत्ती प्रज्वलित करून 'वंदे मातरम' ची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

यावेळी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत,पोलीस निरीक्षक संजय धुमाळ,पोलीस उप निरीक्षक अनमोल रावराणे, बापू खरात,नगरसेवक सुशांत नाईक, आबा दुखंडे, भास्कर राणे , दादा कुडतडकर,हनिफ पिरखान, संजय मालंडकर, पंकज दळी,संजय राणे, बाळू मेस्त्री, सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर,श्याम सावंत,सरिता पवार,सुप्रिया पाटील,प्रदीप मांजरेकर, कलमठ उपसरपंच वैदेही गुडेकर,पत्रकार गणेश जेठे, विजय गावकर,अजित सावंत,भगवान लोके,राजन चव्हाण, संतोष राऊळ,अनिकेत उचले,सादिक कुडाळकर,अनुप वारंग, गितांजली कामत, प्रभाकर कोरगावकर,सुधाताई हर्णे ,दादा बेलवलकर,संदीप कदम ,डॉ.सुहास पावसकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, कणकवलीतील अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना बिग्रेडियर सुधीर सावंत,अशोक कंरबळेकर, पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी संबोधित केले. तर सरिता पवार यांनी संविधानाची शपथ दिली.
 

Web Title: People of Kankavali pay homage to martyrs of 26/11!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.