सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:00 PM2020-08-31T12:00:27+5:302020-08-31T12:02:11+5:30

गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.

People of Sindhudurg are now looking for a palace! | सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

सिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्गवासीयांना आता महालयाचे वेध !साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू ; कोरोनाचे सावट

सुधीर राणे

कणकवली : गणेशोत्सवानंतर आता सिंधुदुर्ग वासीयांना महालयाचे वेध लागले आहेत. अद्याप अकरा दिवसांच्या गणेशोत्सवाचे काही दिवस शिल्लक असले तरी महालयासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी बरोबरच इतर तयारी सुरू झाली आहे. मात्र, कोरोनाचे सावट यावर्षी महालयांवर आहे.

गणेश चतुर्थी दिवशी गणरायांची विधिवत स्थापना केल्यानंतर दीड , पाच ,सात , नऊ दिवसांनी अनेक ठिकाणी गणरायांना निरोप देण्यात आला आहे. १ सप्टेंबर रोजी अकरा दिवसांच्या गणरायाना निरोप देण्यात येणार आहे. तर काही ठिकाणी सतरा, एकविस दिवसानीही गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे.मात्र, यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने समूह संसर्ग रोखण्यासाठी अनेक भाविकांनी दरवर्षी पेक्षा लवकर गणरायाना निरोप देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

सिंधुदुर्गात महालयांना विशेष महत्त्व असते. पितृ पंधरवड्यात आपल्या मृत कुटुंबीयांच्या नावे तिथीनुसार पिंडदान करुन पितरांच्या आत्मांना शांती मिळण्यासाठी धार्मिक विधी केले जातात. तर पितरांच्या नावाने नातेवाईक व ग्रामस्थांना महाप्रसाद वाढला जातो. पितृपक्ष कालावधीत पितर धरतीवर येतात, त्यांना तृप्त केल्यास वर्षभर आपल्या कामांना गती मिळते अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे.

यावर्षी २ सप्टेंबर पासून महालयानां प्रारंभ होणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतर आता लोकांना महालयाचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने तयारी सुरु झाली आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कमी लोकांच्या उपस्थितीत महालय कसे करायचे ? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे.

त्याचप्रमाणे पुरोहित उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. कोरोनामुळे पुरोहित उपलब्ध न झाल्यास पर्यायी व्यवस्था काय करायची ? याबाबत जुन्या जाणत्या व्यक्तींचे मार्गदर्शन घेण्यात येत आहे.

महालयासाठी आवश्यक सामानाची यादी बनवून ते खरेदी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. या विधीसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करणे सध्या सुरू आहे. तर गणेशोत्सवासाठी आपल्या मुळ गावी आलेले अनेक मुंबईकर महालय करुनच परतणार आहेत. त्यांची त्यादृष्टीने तयारी सुरू आहे.

भाजीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता !

महालयांमध्ये अन्नदानाला जास्त महत्व असते. यावेळी करण्यात येणाऱ्या भोजनात विविध प्रकारच्या भाज्यांचा समावेश असतो. गणेशोत्सवाच्या कालावधीत भाजी, फळे यांच्या किमतीत वाढ झाली होती. आता परत महालयांच्या कालावधीत पुन्हा भाज्यांचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे काही भाजी विक्रेत्यांनी सांगितले.

Web Title: People of Sindhudurg are now looking for a palace!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.