जनता दहशतखोरांना त्यांची जागा निश्चितच दाखवेल !- वैभव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 06:16 PM2019-04-11T18:16:37+5:302019-04-11T18:17:15+5:30
रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे.
कणकवली : रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी निलेश राणेंनी केलेल्या दादागिरीतून खासदार कसा नसावा याचे उदाहरणच जनतेसमोर आले आहे. लोकसभा निवडणूक मतदानाच्या तोंडावर कार्यकर्ते आणि मतदारांना अशा प्रकारातून दहशत दाखवली जात आहे. मात्र, जनता दहशतखोरांना त्यांची जागा निश्चितच दाखवेल. अशी टीका शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे केली.
कणकवली येथील विजय भवन मध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक सुशांत नाईक उपस्थित होते. आमदार वैभव नाईक म्हणाले, सत्ता आणि पैसा यांच्या जीवावर राणेंची असलेली मस्ती मागील ५ वर्षात जनतेने उतरवली आहे. टोलनाका तोडफोड प्रकरण , राजन तेली यांच्या मुलाला मारहाण करणे, संदीप सावंतना झालेली मारहाण यावरून राणेंची वृत्ती जनतेला दिसून आली आहे. केवळ इंग्रजी बोलण्यापेक्षा चांगले वर्तन महत्वाचे आहे.
नितेश व निलेश राणे यांचा सत्ता आणि संपत्तीची जोड घेऊन जनतेत दहशत निर्माण करणे यात हातखंडा आहे. त्यांची ही प्रवृत्ती काही केले तरी बदलू शकत नाही. हे सर्वांनाच माहीत झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील इतर नेत्यांच्या मुलांना विविध पक्षात प्रवेश दिला जात आहे. मात्र, यांना कोणताच पक्ष प्रवेश देत नाही. त्यामुळे त्यांची मोठी अडचण झाली आहे.
यापूर्वी घडलेल्या घटना पहाता त्यांच्या पक्षाचा प्रचार करणा?्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीनंतर आपली काय स्थिती होऊ शकते ? याचा प्रथम विचार करावा आणि त्यानंतरच प्रचार करावा आणि सावध रहावे. दुस?्यांचे शिक्षण किती झाले ? उमेदवार इंग्लिश बोलतो काय? असले अनावश्यक प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण नेमके काय करतो ? याचा आधी विचार करावा आणि त्यानंतरच दुस?्यांना उपदेश करावा .
गेली चार वर्षे शांततेत असलेला जिल्हा अशांत करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केला जात आहे. मात्र जनता त्याला भीक घालणार नाही. निष्ठावंत शिवसैनिकांची काळजी राणे व त्यांच्या पुत्रांनी करू नये. त्यासाठी शिवसेना सक्षम आहे. मात्र, राणेंच्या पुत्रांनी अनेक निष्ठावंत कार्यकत्यार्ना दुखावले आहे. त्यामुळे ते त्यांची साथ सोडून गेले आहेत. हेही प्रथम लक्षात घ्यावे . असा टोलाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी लगावला .
उध्दव ठाकरे १८ रोजी कणकवलीत !
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली येथे १८ एप्रिल रोजी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे येणार असून त्यांची जाहीर प्रचार सभा होणार आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली .