संपूर्ण जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2020 04:48 PM2020-04-27T16:48:00+5:302020-04-27T16:49:44+5:30

सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेवर ताण असल्याचे जाणवते. पोलीस, आरोग्य खाते, प्रशासकीय खात्यातील काही अधिकारी सोडले तर अन्य अधिकाऱ्यांना कुठलीही जबाबदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी विविध तपासणी नाके किंवा जिथे शक्य असेल तेथे शिक्षण खात्याचे अधिकारी, शिक्षक यांना पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करता येऊ शकते का?

Perform rapid tests throughout the district | संपूर्ण जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करा

संपूर्ण जिल्ह्यात रॅपिड टेस्ट करा

Next
ठळक मुद्देनीतेश राणे यांच्या प्रशासनाला सूचना : कोरोना विषाणूची पार्श्वभूमी

कणकवली : मुंबईत ज्यांना कोरोनाचा आजार आहे त्यांचीच रॅपिड टेस्ट होते. तशी चूक सिंधुदुर्गात करू नका. केरळ आणि राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याने ज्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात प्रत्येकाची रॅपिड टेस्ट करून खऱ्या अर्थाने कोरोना विरुद्धचा लढा जिंकला तशी तपासणी सिंधुदुर्गात होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना आमदार नीतेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला केली आहे.

त्यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हा हा कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहे असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात येते. पण, सिंधुदुर्गमध्ये दरदिवशी फक्त १० ते १५ चाचण्या होत आहेत. जे रुग्ण जिल्हा रुग्णालयात जातात त्यांचीच कोरोनाची तपासणी होते.

सिंधुदुर्गला खºया अर्थाने कोरोनाच्या विरुद्ध हा लढा जिंकायचा असेल तर जसे केरळ राज्याने किंवा राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात ह्यरॅपिडह्ण टेस्टद्वारे प्रत्येकाची तपासणी केली. तसेच खºया अर्थाने कोरोना विरुद्धचा लढा जिंकला तसे करावे लागेल. परंतु, तसा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून होताना दिसत नाही. कमी चाचण्या होत असल्याने रुग्णांचा आकडाही कमी आहे. जी चूक मुंबईमध्ये झाली आहे त्याच पद्धतीची चूक सिंधुदुर्गने करू नये.
नडगिवेमध्ये एक रुग्ण सापडल्यानंतर पूर्ण गावाला क्वारंटाईन करून आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन प्रत्येकाची तपासणी केली होती. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी ह्यरॅपिड टेस्ट किट्सह्णची मागणी करूनही आजपर्यंत ते उपलब्ध झालेले नसल्याचे सांगितले. जास्तीतजास्त रुग्णांची रॅपिड टेस्ट करून पूर्ण जिल्ह्याची तपासणी करणे हा कोरोना मुक्त जिल्हा होण्यासाठी खरा मार्ग आहे.

सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस यंत्रणेवर ताण असल्याचे जाणवते. पोलीस, आरोग्य खाते, प्रशासकीय खात्यातील काही अधिकारी सोडले तर अन्य अधिकाऱ्यांना कुठलीही जबाबदारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेली नाही. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी विविध तपासणी नाके किंवा जिथे शक्य असेल तेथे शिक्षण खात्याचे अधिकारी, शिक्षक यांना पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करता येऊ शकते का? याबाबतची चर्चा प्रशासनाने शिक्षक संघटना व शिक्षणाधिकारी यांच्याशी करावी. असाच प्रयत्न रायगड व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यात यशस्वी केला जात आहे. त्यामुळे तसा प्रयत्न सिंधुदुर्गात व्हावाख असेही राणे यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Perform rapid tests throughout the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.