कणकवलीत पेट्रोल टंचाई, वाहनचालक त्रस्त; पेट्रोलसाठी लांबच-लांब रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2022 12:28 PM2022-04-15T12:28:06+5:302022-04-15T12:30:09+5:30
दिवसागणिक इंधनाचे भाव वाढत आहेत. असे असले तरी वाहनधारकांच्या संख्येत घट होतानाचे दिसत नाही.
कणकवली : कणकवली तालुक्यातील काही ठिकाणच्या पेट्रोल पंपावर पेट्रोलचा तुटवडा झाला आहे. यामुळे वाहनधारकांची मोठी गोची झाली आहे. शहरातील एकाच पेट्रोल पंपावर पेट्रोल मिळत असल्याने वाहनधारकांच्या लांबच-लांब रांगा लागल्या आहेत.
पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्याने वाहन चालकांना वाहने रस्त्यावर आणणे कठीण बनले आहे. शहरातील पोलिसांच्या पेट्रोल पंपावर तर मागील काही दिवस पेट्रोल संपलेले आहे. तर बस स्थानकाशेजारी असलेल्या पेट्रोल पंपावर देखील पेट्रोलचा तुटवडा आहे. केवळ वागदे येथील पेट्रोल पंपावर फक्त स्पीड पेट्रोल शिल्लक असल्याने वाहन चालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कणकवलीत पेट्रोलची कमतरता असल्याने वाहन चालकांना आता वाहन कसे चालवायचे ? असा प्रश्न पडला आहे.
दुसरीकडे पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी ओलाडंली आहे. महागाईने जनता हैराण झाली आहे. यातच दिवसागणिक इंधनाचे भाव वाढत आहेत. असे असले तरी वाहनधारकांच्या संख्येत घट होतानाचे दिसत नाही.