धावता पिकअप झाडाने अडला, नदीत कोसळण्यापासून वाचला; तीन महिलांना गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:25 PM2024-01-24T13:25:44+5:302024-01-24T13:26:01+5:30

..तर पिकअप नदीत कोसळला असता

Pickup vehicle accident at Fondaghat; Three women were seriously injured | धावता पिकअप झाडाने अडला, नदीत कोसळण्यापासून वाचला; तीन महिलांना गंभीर जखमी 

धावता पिकअप झाडाने अडला, नदीत कोसळण्यापासून वाचला; तीन महिलांना गंभीर जखमी 

कणकवली : कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूरमधील उगवाई मंदिर याठिकाणी वनभोजनासाठी गेलेल्या फोंडाघाट येथील महिंद्रा पिकअप वाहनाला अपघात झाला. त्यामध्ये दोन जण किरकोळ जखमी झाले, तर तीन जणांना गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी अकरावीच्या सुमारास घडली.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, फोंडाघाटमधील काही महिला दाजीपूरमधील उगवाई मंदिर येथे वनभोजनासाठी गेल्या होत्या. दोन वाहनांमधून महिलांचा ग्रुप त्या मंदिर परिसरामध्ये पोहोचला. मात्र, त्यामधील पिकअप महिंद्रा गाडीतील महिला खाली उतरण्यापूर्वी वाहन चालक गाडीचा हँडब्रेक ओढून खाली उतरला, तरीही तीव्र उतार असल्याने गाडी उताराने मागे जाऊन एका झाडाला आदळली. यामध्ये पिकअप गाडीतील काही महिला बाहेर फेकल्या गेल्या. त्यामध्ये तीन महिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी कुडाळ येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले, तर दोन महिलांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांना फोंडाघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे.

..तर पिकअप नदीत कोसळला असता

दरम्यान,या अपघाताची गंभीरता पाहता या महिलांचे नशीब बलवत्तर होते म्हणून पिकअप गाडी झाडाला अडकून राहिली, अन्यथा किमान दहा फूट खोल नदीचे पात्र होते. त्यात ती कोसळली असती तर अपघाताची गंभीरता वाढली असती. या अपघाताची नोंद कणकवली पोलिस ठाण्यात झालेली नसल्याने जखमींची नावे समजू शकलेली नाहीत.

Web Title: Pickup vehicle accident at Fondaghat; Three women were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.