आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी सज्ज! जादा गाड्यांचे नियोजन; कोणत्या गावातून किती गाड्या धावणार..जाणून घ्या

By सुधीर राणे | Published: February 2, 2023 01:19 PM2023-02-02T13:19:34+5:302023-02-02T13:20:08+5:30

ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध!

Planning of extra trains of ST bus service for Yatra at Anganewadi in Malvan taluka | आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी सज्ज! जादा गाड्यांचे नियोजन; कोणत्या गावातून किती गाड्या धावणार..जाणून घ्या

आंगणेवाडी यात्रेसाठी एसटी सज्ज! जादा गाड्यांचे नियोजन; कोणत्या गावातून किती गाड्या धावणार..जाणून घ्या

Next

कणकवलीः मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या यात्रेसाठी एसटीचा सिंधुदुर्ग विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्याच्या विविध आगारातून आणि विविध भागातून एसटीच्या १४५ बस सोडण्यात येणार आहेत. रेल्वेतून येणाऱ्या प्रवाशांनाही एसटी बस सेवा दिली जाणार आहे.

भराडी देवीच्या यात्रेसाठी लाखो भाविक सिंधुदुर्गात दाखल होत असतात. ४ फेब्रुवारीला ही यात्रा होत असून एसटीच्यावतीने ३  ते ५ फेब्रुवारीपर्यंत बस गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एसटी महामंडळाच्या वतीने यंदा ३ तारीखपासून रात्री १० वाजता बस सेवा सुरू होत आहे. ३ आणि ४ फेब्रुवारीला कणकवली रेल्वे स्टेशन ते कणकवली एसटी आगार तसेच मालवण आणि आंगणेवाडी येथे जाणाऱ्या प्रवासासाठी थेट एसटी बस सेवा देण्यात आली आहे. 

कुडाळ आगारामधूनही ३ ते ४ फेब्रुवारीला कुडाळ रेल्वे स्टेशन ते मालवण आणि आंगणेवाडी परिसरातील प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. याचबरोबर कुडाळ ते आंगणेवाडी २२ गाड्या, कसाल हिवाळेमार्गे आंगणेवाडी ५ गाड्या, कसाल, खोटले ते आंगणेवाडी ५ गाड्या, निरुखे, पांग्रड ते आंगणेवाडी ३ गाड्या, पणदूर, ओरोस ते आंगणेवाडी एक गाडी अशा कुडाळ येथून ३५ गाड्या धावतील. 

मालवण तालुक्यातील मालवण बस आगार ते आंगणेवाडी २० गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते अंगणेवाडी ३ गाड्या, देवबाग तारकर्ली ते आंगणेवाडी ४ गाड्या, आनंदव्हाळ ते आंगणेवाडी, डांगमोडे ते आंगणेवाडी, सर्जेकोट ते आंगणेवाडी, मालोंड ते आंगणेवाडी, मसुरे ते आंगणेवाडी, चौके, देवली, आंबेरी ते आंगणेवाडी, देवली ते वायरी मार्गे आंगणेवाडी, वराड ते आंगणेवाडी, तळगाव, सुकळवाड ते आंगणेवाडी, तिरवडे, मसुरे ते आंगणेवाडी, कट्टा, कुणकुवण ते आंगणेवाडी, धामापूर ते आंगणेवाडी प्रत्येकी एक बस गाडी धावणार आहे. तालुक्यातून ४९ बसगाड्या ठेवण्यात आल्या आहेत. 

कणकवली आगारातून आंगणेवाडी ३९ गाड्या, अजगणी, असरोंडी मार्गे आंगणेवाडी २ अशा ४१ गाड्या सोडण्यात येणार आहेत. देवगड तालुक्यातील देवगड आगार ते आंगणेवाडी २, आचरा ते आंगणेवाडी ४, हिंदळे, मुणगे ते आंगणेवाडी ३ गाड्या, तर तोंडवली, तळाशील ते आंगणेवाडी, कुडोपी ते आंगणेवाडी, आरे, निरोम ते आंगणेवाडी, आचरा, चिंदर, त्रिंबक ते आंगणेवाडी अशा एकूण १३ गाड्या धावणार आहेत. 

विजयदुर्ग आगारातून विजयदुर्ग आंगणेवाडी ५ गाड्या तर वेंगुर्ले आजारातून पाट, परुळे (आडारी मार्गे) ते आंगणेवाडी २ बस गाड्या सोडण्यात येणार आहेत. भराडी देवीच्या यात्रेसाठी तयार केलेल्या एसटी आगारांमध्ये नियंत्रण कक्ष मालवण केंद्र क्रमांक १, कुडाळ आणि कणकवलीसाठी केंद्र क्रमांक २ आणि मसुरेसाठी केंद्र क्रमांक ३ तयार करण्यात आले आहे. या गाड्यांमधून नियमित सवलतही प्रवाशांना मिळणार आहे.

ग्रुप बुकिंगची सुविधा उपलब्ध!

एसटी महामंडळातर्फे भाविकांसाठी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून एसटी बस हवी असल्यास तशी सुविधा एसटी महामंडळाने केली आहे.

प्रवाशांना गावापासून थेट आंगणेवाडीपर्यंत जाण्यासाठी ही सुविधा आहे. यामध्ये २०० किलोमीटरला सर्वसाधारण अकरा ते बारा हजार रुपये एसटी महामंडळाकडून आकारले जातात. ही सेवा २४ तासांसाठी दिली जाते. त्यामुळे ग्रुप बुकिंगसाठी विशेष गाड्याही उपलब्ध करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

Web Title: Planning of extra trains of ST bus service for Yatra at Anganewadi in Malvan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.